

Vidarbha Polls Heat Up as Political Heirs Secure Key Nominations
Sakal
नागपूर: राजकारणात घराणेशाही या मुद्द्यावरून विरोधक व सत्ताधारी एकमेकांवर टीकेची झोड उठवत असले तरी ते सर्वच एकाच माळेचे मणी असल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांसाठी असताना येथे देखील घराणेशाहीने बाजी मारली आहे. विदर्भात नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षासाठी उभे असलेल्या उमेदवारांमध्ये बहुतांश ठिकाणचे उमेदवार राजकारण्यांच्या नाते संबंधातील आहेत. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांना परत एकदा सतरंज्याच उचलण्याची वेळ आली आहे. नेत्यांच्या सग्यासोयऱ्यांना मतदार किती कौल देतात हे तीन डिसेंबरला मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.