esakal | इको फ्रेंडली गणेश निर्मितीचे धडे देतोय एम. टेक. झालेला तरुण
sakal

बोलून बातमी शोधा

Eco Friendly Ganesh Creation Lessons

डीजे, ढोल पथकांचा मोठा आवाज नसला तर उत्सव साजरा होत नाही, या भ्रामक समजातून या मंडळांना बाहेर आणावे लागेल. एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना रुजवली तर लोकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमही पाहता येतील, असे त्याचे म्हणणे आहे.

इको फ्रेंडली गणेश निर्मितीचे धडे देतोय एम. टेक. झालेला तरुण

sakal_logo
By
मनीषा मोहोड

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशोत्सवाची परंपरा समाजात रुजू लागली आहे. नागपुरातील एम. टेक. झालेला समीर श्रीकांत देवळे या युवकाने पुढाकार घेत इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारणे आणि इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रबोधन करीत आहे.

समीर स्वतः १२ वर्षांपासून घरीच गणेशमूर्ती तयार करून त्याची स्थापना करतो. यंदा लॉकडाऊनमध्ये बराच वेळ घरी रिकामा मिळाल्याने समीरने आपल्यासारखेच इतरांनीही इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ‘इको फ्रेंडली गणेशोत्सव’ म्हणजे शाडूच्या गणेश मूर्तीपासून सजावट ते थेट विसर्जनापर्यंत सर्वकाही निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे समीरच्या कार्यशाळेचा उद्देश आहे.

क्लिक करा - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचवला कोविड नियंत्रणासाठी उपाय, वाचा काय म्हणाले ते...

सार्वजनिक गणेशोत्सव इको फ्रेंडली पद्धतीने साजरे व्हावेत, यादृष्टीने प्रबोधन करण्याचे काम समीर आपल्या कार्यशाळेत करीत आहे. कारण, अनेक जण जे आपला घरगुती गणेशोत्सव साधेपणाने व पर्यावरणाला पूरक अशा रीतीने साजरा करतात ते सार्वजनिक उत्सवात मात्र पर्यावरणाची हानी बिनदिक्कत करतात. डीजे, ढोल पथकांचा मोठा आवाज नसला तर उत्सव साजरा होत नाही, या भ्रामक समजातून या मंडळांना बाहेर आणावे लागेल. एक वॉर्ड एक गणपती ही संकल्पना रुजवली तर लोकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमही पाहता येतील, असे त्याचे म्हणणे आहे.

जाणून घ्या - केसात कोंडा होतोय? आता घाबरू नका.. तुमच्या रोजच्या वापरातील या वस्तू ठरतील रामबाण उपाय...नक्की वाचा

चुकीच्या प्रथांना विरोध

धर्माला अटकाव नाही तर त्यातील चुकीच्या प्रथांना असलेला विरोध आहे. हे सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न समीर करतो आहे. समीरच्या कार्यशाळेत पारूल, जय बोंडे, कश्मिरा बोंडे, नीलय राऊत, मानसी राऊत, वीरेंद्र जाधव, नुपूर लीचदे, षण्मुख पटनायक, मृनाली बिवलकर यांनी सात प्रकारच्या गणेश मूर्ती तयार केल्या आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top