esakal | महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur : महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?

महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विद्यमान महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ फेब्रुवारीपर्यंत आहे. त्यानंतर निवडणूक अपेक्षित असून राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश दिले आहेत. परंतु हा आराखडा किती दिवसांत तयार करायचा? याबाबत स्पष्टता नाही. याशिवाय प्रभागासाठी महिला व इतर आरक्षणासंदर्भात अद्यापही कुठलेही आदेश नाहीत. त्यामुळे महापालिका निवडणूक फेब्रुवारी-मार्चऐवजी पुढे ढकलल्या जाण्याची चर्चा अधिकारी वर्गात रंगली आहे.

महापालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग असणार की एक सदस्य, यावरून गेले काही महिने चर्चा सुरू होती. अखेर याबाबत निवडणूक आयोगाने मागील महिन्यात आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही निवडणूक पुढे ढकलली जाणार की निश्चित वेळेत होणार? यावरही विविध पातळ्यांवर चांगलीच चर्चा रंगली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाचा असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणूक निश्चित वेळेत होईल, असा एक मतप्रवाह आहे. परंतु महापालिका अधिकारी वर्गात वेगळीच चर्चा आहे.

महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेसाठी कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यात दिले. त्यानुसार महापालिकेने एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले असून ते प्रगतिपथावर आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी कालावधी निश्चित केला नाही.

साधारणपणे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशात कालावधी निश्चित केला जातो. परंतु मागील महिन्यात काढलेल्या आदेशात कच्चा आराखडा कधीपर्यंत तयार करावा, याबाबत कुठलीही स्पष्टता नाही. याशिवाय ओबीसी आरक्षण वगळून महिला आरक्षणाबाबतही अद्याप निवडणूक आयोगाने आदेश काढले नाही. याशिवाय राज्य सरकारने दोन सदस्यीय प्रभाग रचनेस मंजुरी दिल्यास पुन्हा नव्याने आराखडा तयार करावा लागणार आहे. त्यामुळे आणखी वेळ लागणार आहे. त्यामुळे काही महिन्यांसाठी निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

हेही वाचा: मुंबई पुन्हा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? गृहमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

जेवढी लोकसंख्या तेवढेच मतदार

सध्या एक सदस्यीय प्रभाग रचनेसाठी २०११ च्या लोकसंख्येनुसार कच्चा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. २०११ च्या लोकसंख्येनुसार कच्चा आराखडा तयार करण्यात येत असल्याने एका प्रभागाची लोकसंख्या १६ हजारापर्यंत येत असल्याचे सूत्राने नमुद केले. परंतु गेल्या दहा वर्षात शहर सीमेवरील वस्त्यांमध्ये घरांची संख्या व पर्यायाने लोकसंख्याही वाढली. स्वाभाविकपणे मतदारांची संख्याही वाढली असेल. त्यामुळे प्रभागाची लोकसंख्या व मतदारांची संख्याही १६ हजार किंवा त्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

loading image
go to top