
Ahmedabad airport: Passengers disembarking safely after the emergency landing.
नागपूर: नागपूरहून अहमदाबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या कॉकपिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या ३० मिनिटांत विमान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळी उतरविण्यात आले. विमानात ७८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. पायलटने तत्परतेने निर्णय घेतल्याने मोठा अनर्थ टळला.