अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा तलावात बुडून मृत्यू

मित्र बुडत असल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी उडी घेणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
Engineering student drowns in pond nagpur
Engineering student drowns in pond nagpursakal

नागपूर : तलावात पोहताना मित्र बुडत असल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी उडी घेणाऱ्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. एस. राहुल रेड्डी (वय २२, रा. तेलंगना) असे मृत युवकाचे नाव असून तो विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेतील यांत्रिकी विभागात तृतीय वर्षाला शिकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल एस. रेड्डी त्याच्या सहा मित्र-मैत्रिणींसोबत अंबाझरी तलावाकडे फिरायला गेला. या

वेळी त्याच्या एका मित्राला पोहण्याचा मोह न आवरल्याने त्याने पाण्यात उडी घेतली. यावेळी मैत्रिणीसमोर बडेजावपणा करण्यासाठी तो खोल पाण्यात गेला. त्यामुळे तो बुडत असल्याचे इतर मित्रांना दिसून आले. त्याला वाचविण्यासाठी राहुलने पाण्यात उडी घेतली. मात्र, त्यालाच पोहता येत नसल्याने तो बुडायला लागला. त्यामुळे मित्र-मैत्रिणींनी मदतीसाठी आरडाओरड केली. बऱ्याच अंतरावर असलेल्या युवकांनी धावत येऊन पाण्यात उडी घेतली आणि तरुणाला वाचवले. दरम्यान राहुल हा पाण्यात दिसेनासा झाला. त्याचा बराच वेळ शोध घेतला असता तो मिळून आला नाही. काही वेळाने त्याचा मृतदेहच सापडला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com