esakal | पशुपालकांसाठी ‘बॅड न्यूज'; मराठवाड्यानंतर विदर्भात झाली रोगाची एन्ट्री, शेतकरी धास्तावले
sakal

बोलून बातमी शोधा

Entry of Lumpy Skin Disease in Vidarbha after Marathwada

लंपी स्क्रीन डिसीज हा आजार देवी विषाणू गटातील कॅप्रीपाॅक्स या विषाणूमुळे होतो. बाधित जनावराच्या त्वचेवरील वण, स्त्राव, नाकातील स्त्राव, लाळ, दूध, वीर्य यासारख्या माध्यमावारे निरोगी जनावरांमध्ये पसरतो.

पशुपालकांसाठी ‘बॅड न्यूज'; मराठवाड्यानंतर विदर्भात झाली रोगाची एन्ट्री, शेतकरी धास्तावले

sakal_logo
By
अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर) : विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. त्यांच्याकडे गाई आणि म्हशीही आहेत. काही शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून जनावर पाळतात तर काही जण दुधाचा व्यवसाय करण्यासाठी. तसेच शेतीसाठी गायची गरज भासतस असते. यामुळे शेतकऱ्यांकडे गाई आणि म्हशी मोठ्या प्रमाणात आहेत. आता मात्र या शेतकऱ्यांसाठी दुखद बातमी आली आहे. काय आहे प्रकार वाचा...

मागील काही दिवसांपासून हिंगणा तालुक्यातील जनावरांच्या अंगावर गाठी दिसून आल्या. याची माहिती मिळतात पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋचा लांजेवार यांनी जनावरांची तपासणी केली. यात सुकळी कलर गावात ७०, धानोरी ३, डेगमा ४, दाभा ८, कवडस १, आगरगाव १३ असे एकूण ९९ जनावरांना लंपी स्क्रीन डिसीज आजार झाल्याचे लक्षात आले.

अधिक माहितीसाठी - पतीला तिळतिळ मरताना बघू शकत नाही.. असं म्हणत तिनं उचललं टोकाचं पाऊल.. आणि सगळंच संपलं

गाई व म्हशीमधील सर्व वयाच्या जनावरांना लंपी स्क्रीन डिसीज हा त्वचारोग होऊ शकतो. आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण साधारणत १० ते २० टक्के असून, मृत्यूदर १ ते ५ टक्के आहे. देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. लंपी स्क्रीन डिसीज हा आजार देवी विषाणू गटातील कॅप्रीपाॅक्स या विषाणूमुळे होतो. बाधित जनावराच्या त्वचेवरील वण, स्त्राव, नाकातील स्त्राव, लाळ, दूध, वीर्य यासारख्या माध्यमावारे निरोगी जनावरांमध्ये पसरतो.

संवर्ग विकास अधिकारी महेंद्र जुवारे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला गावात फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुक्यात या आजाराचा विळखा पसरू नये, यासाठी पशुधन विभागाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पशुपालकांनी हा रोग आढळून आल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋचा लांजेवार यांनी केले आहे.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

पशुपालकांमध्ये पसरली धास्ती

मराठवाडा विभागातील काही गावात लंपी स्क्रीन डिसीज हा आजार आढळून आला आहे. या आजाराने आता विदर्भात प्रवेश केला आहे. हिंगणा तालुक्यात जवळपास शंभर जनावरांना हा आजार जडला आहे. यामुळे जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी दिसून येत आहे. यामुळे पशुपालकांमध्ये धास्ती पसरली आहे.

गोठ्यात फवारणी करून स्वच्छता ठेवा
हिंगणा तालुक्यात प्रथमच लंपी स्क्रीन डिसीज आजार जनावरांमध्ये आढळून आला. मराठवाड्यामध्ये हा आजार काही जनावरांना आठवून आला होता. विदर्भात प्रथमच हा आजार दिसून आला. पशुसंवर्धन विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे. जनावरांना लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. पशुपालकांना पंचायत समिती प्रशासनातर्फे सूचना देण्यात आल्या आहे. गोठ्यात फवारणी करून स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आजाराची जनावरे आढळल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
- डॉ. ऋचा लांजेवार,
पशुधन विकास अधिकारी (विस्तार) हिंगणा

प्रादुर्भावग्रस्त जनावरांसाठी लसीकरण

  • प्रादुर्भावग्रस्त भागापासून पाच किलोमीटर येणाऱ्या सर्व गावातील चार महिने वयावरील गाय व म्हैस वर्गातील जनावरांना पशुतज्ज्ञांकडून गोट फॉक्स लस एक मिलीमीटर प्रति जनावर याप्रमाणे सबक्यूॅटनीयास मार्गाने टोचावी
  • आधीच रोग ग्रस्त असणाऱ्या जनावरांना लस पोचण्यात येऊ नये
  • प्रादुर्भावग्रस्त जनावरांपासून इतर जनावरांना वेगळे ठेवण्यात यावे

संपादन - नीलेश डाखोरे

loading image
go to top