नागपुरात बूस्टर डोसनंतरही २०० जणांना बाधा

मेडिकलमध्ये घेतली होती मात्रा
Corona Update News
Corona Update Newssakal

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन किमान सात महिने उलटल्यानंतर बुस्टर डोस कोरोनासह इतर आजारांवर रामबाण उपाय ठरतो,असा दावा करण्यात आला

नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन किमान सात महिने उलटल्यानंतर बुस्टर डोस कोरोनासह इतर आजारांवर रामबाण उपाय ठरतो,असा दावा करण्यात आला होता. परिणामी कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने बूस्टर डोस घेण्याच्या सूचना जारी केल्या. फ्रन्ट लाईन वर्कर,ज्येष्ठ नागरिकांना विशिष्ट कालावधीनंतर बूस्टर डोस सुरू झाले. पण बूस्टरचा डोस घेतल्यानंतरही मेडिकलमध्ये सुमारे २०० जणांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने विळख्यात घेतले. यात डॉक्टरांपासून तर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना समावेश आहे. यातील सारेच विलगीकरणात होते.

Corona Update News
नागपूर : व्याघ्र संवर्धनासाठी ५० कोटीची वाढ

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आजपर्यंतच्या तिसऱ्या लाटेत मध्य भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधितांवर नागपूरच्या मेडिकलमधील कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसह (फ्रन्ट लाईन वर्कर)सह जेष्ठांसाठी लसीकरण सुरू झाले. मेडिकलमधील डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंतमध्ये सुरवातीला लस घेण्याबाबत उदासीनता होती. परंतु पुढे लसीकरणासाठी गर्दी होऊ लागली. मेडिकल, सुपरमध्ये पहिला व दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ६ हजारांवर होती. यापैकी २२०० कर्मचाऱ्यांनी बुस्टरचा तिसरा डोस घेतला. यापैकी २०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती माहिती पुढे आली आहे. बहुतांश अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सौम्य लक्षणे होती. तीव्र लक्षणे असलेल्यांपैकी निवडक अधिकारी, कर्मचारी वगळून इतर सगळ्यांवर गृह विलगिकरणात उपचार झाले.

Corona Update News
अकाेला : कर भरणार नाही; रस्ता आम्हीच दुरुस्त करतो!

ओमिक्रॉनचे संकेत

तिसऱ्या लाटेत उपराजधानीतील अनेक कोरोनाबाधित असलेल्या नागरिकांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी पूणेतील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा अथवा नागपुरातील निरीच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. त्यात अनेकांमध्ये कोरोनाचा ओमिक्रॉन हे रुप असल्याचे अहवालातून सिद्धही झाले आहे. मेडिकलमधील बहुतांश रुग्ण लवकर बरे झाल्याचे बघता त्यांना ओमिक्रॉनची बाधा झाल्याचे संकेत होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नागपुरात ओमिक्रॉनचे ४२ बाधित

कोरोनाची तिसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर आहे. मात्र ही लाट सुरू असताना ओमिक्रॉनचेही संकट घोंघावत आहे. राज्यात बुधवारी (ता.२) ११३ ओमिक्रॉनबाधित आढळले. यातील ४२ जण नागपूर जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोना आणि ओमिक्रॉनचे दुहेरी आक्रमण झाल्यास चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.

Corona Update News
आमच्या सरकारमुळे गरीब लक्षाधीश ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना तसेच ओमिक्रॉनच्या दुहेरी आक्रमण असले तरी सद्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. त्यातच ओमिक्रॉनचे रुग्ण सात दिवसांत बरे होत आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ३हजार ३३४ ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. बुधवारी (ता. २) नागपुर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, अमरावती, सातारा, सिंधूदुर्ग आणि उस्मानाबाद येथील १०२ ओमिक्रॉनबाधित आढळले तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार औरंगाबाद, नाशिक, पिंपरी चिंचवड मनपा, रायगड आणि उल्हासनगर महापालिकेतील प्रत्येकी एक जण ओमिक्रॉनबाधित आढळला आहे. नागपुरात आतापर्यंत तिनशेवर ओमिक्रॉनबाधितताढळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com