esakal | फेसबुक फ्रेंडने लंडनमधून पाठवले गिफ्ट, सत्य माहिती होताच सरकली पायाखालची जमीन

बोलून बातमी शोधा

cyber-crime.png
फेसबुक फ्रेंडने लंडनमधून पाठवले गिफ्ट, सत्य माहिती होताच सरकली पायाखालची जमीन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फेसबुकवरून लंडनमधील युवतीशी मैत्री झाल्यानंतर तिने महागडे गिफ्ट पाठवल्याचा बनाव केला. त्यानंतर उच्चशिक्षित युवकाला सायबर गुन्हेगाराच्या टोळीने दोन लाख पाच हजार रुपयांनी गंडा घातला. संकल्प महेश पटले (वय ३२ रा. वेदआर्य कॉलनी) याने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वेनिसा स्कॉड, सुमित राणा, समीर गुहा, श्रद्धा मिश्रा व सुमन शहा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

संकल्प पटले हा आयटी कंपनीत टेक्निशियन आहे. गतवर्षी वेनिसा स्कॉड हिने संकल्प याला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठविली. त्याने ती एक्सेप्ट केली. त्यानंतर ती संकल्पसोबत चॅट करायला लागली. तिने संकल्प याला भेटवस्तू पाठविण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, सुमित राणा याने संकल्प याच्या मोबाईलवर संपर्क साधला. कस्टम अधिकारी बोलत आहे. भेटवस्तू सोडविण्यासाठी पैसे जमा करण्यास सांगितले. राणा याने समीर, श्रद्धा व सुमन या तिघांच्या बँक खात्याचे क्रमांक दिले. संकल्प याने तिघांच्या खात्यात एकूण दोन लाख पाच हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्याला भेटवस्तू मिळाली नाही. त्यानंतर सायबर गुन्हेगाराच्या टोळीच्या जाळ्यात फसल्याचे कळले. फसवणूक झाल्याने संकल्प याने कपिलनगर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत नागपुरातील शेकडोंना अशाप्रकारे फेसबुक फ्रेंडच्या नावावर गंडा घातल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.