esakal | नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

नागपूरकरांनो घाबरू नका! बाधितांची संख्या होतेय कमी; कोरोनावर मात करणाऱ्यांचं प्रमाण अधिक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना विषाणूंची साखळी खंडित करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फायदा होत असल्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन तीन दिवसांपासून पॉझिटिव्ह होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. गेल्या चोवीस तासांत ६२८७ नागरिक बाधित झाले असले तरी ६८६३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. परंतु, मंगळवारी १०१ रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंताही वाढली आहे.

हेही वाचा: अमरावतीकरांनो सावधान! रस्त्यांवर फिरतोय कोरोना व्हायरस; नियमांचं पालन कराच; अन्यथा...

गत दोन दिवसांमध्ये १२ हजार ९९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. याउलट १२ हजार ७८४ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले. याच काळात मृतांचा आकडाही नव्वदीखाली होता. मात्र, जिल्ह्यात साडेपाचशेपेक्षा अधिक व्यक्ती व्हेंटिलेटरवर असल्याने गंभीर रुग्णांचा मृत्यू होत आहे. आज १०१ रुग्ण दगावल्याने मृतांची एकूण संख्या ७ हजार १२६ एवढी झाली आहे. यापैकी ४ हजार ३५५ मृत्यू शहरातील तर १ हजार ७४३ ग्रामीण भागातील आहेत. जिल्ह्याबाहेरचे १ हजार २८ मृत्यू आहेत. तर बाधितांची आतापर्यंतची संख्या ३ लाख ८६ हजार३२७ झाली आहे. यात शहरातील २ लाख ८१ हजार ४२८ तर ग्रामीण भागातील १ लाख ३ हजार ६८९ वर पोहचली आहे.

जिल्ह्यात आज २२ हजार ९०८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यामुळे आतापर्यंत चाचण्यांचा आकडा २२ लाख ३०२ झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांपैकी ६१ हजार रुग्ण घरीच उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात मंगळवारी ६ हजार८६३ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्तांचा आकडा ३ लाख २ हजार ४८० झाला आहे. दर दिवसाला इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनावर रुग्णांकडून मात करण्यात येत असल्याने खाटा रिक्त होत आहेत. मात्र तरीदेखील कोरोनाबाधितांना खाटा मिळत नाही, अशी बोंबाबोंब सुरू आहे.

मनोरुग्णालयात ५ मृत्यू

प्रादेशिक मनोरुग्णालय हे कोरोनचे नवे हॉटस्पॉट तयार झाले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मनोरुग्णालयात केवळ बोटावर मोजण्याइतके रुग्ण आढळून आले होते. मात्र दुसऱ्या लाटेत मनोरुग्णालयात दाखल असलेल्या ४०० रुग्णांपैकी तब्बल १२४ जणांना कोरोनाची बाधा झाली. तर आतापर्यंत ५ मनोरुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. बाधितांमध्ये २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

२६ एप्रिल

-कोरोनाबाधित- ५८५२

-कोरोनामुक्त- ५९२१

हेही वाचा: वरिष्ठ डॉक्टरकडून महिला डॉक्टरला शारीरिक सुखाची मागणी; मेडिकेअर हॉस्पिटलमधील घटना

२७ एप्रिल

-कोरोनाबाधित - ६२८७

-कोरोनामुक्त - ६८६३

संपादन - अथर्व महांकाळ

loading image