गडकरींची स्तुती तर फडणवीसांना टोला; राज्य सरकारने विचार करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

गडकरींची स्तुती तर फडणवीसांना टोला; निषेध रॅलीने वातावरण खराब

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बुधवारपासून (ता. १७) विदर्भाच्या दौऱ्यावर आले आहेत. शरद पवार विदर्भ दौऱ्यात गडचिरोली, वडसा, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. नागपुरात नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.

महाराष्ट्रात प्रादेशिक असमतोल आहे. हा प्रादेशिक असमतोल दूर करायला पाहिजे. याकडे राज्य चालविणाऱ्यांनी लक्ष द्यावे. पाच वर्ष विदर्भातील नेतृत्वाकडे राज्याची सत्ता होती. स्थानिक समस्या सोडवणे त्यांचे कर्तव्य होते, असे म्हणत शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

हेही वाचा: शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना हाणला टोला; म्हणाले...

दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांनी स्तुती केली. नितीन गडकरी हे समस्या सोडविणारे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या ते जाणून घेतात आणि तातडीने सोडवतात. समस्या घेऊन येणारा कोणत्या पक्षाचा आहे याचा विचार ते कधीही करीत नाही. पक्ष विसरून ते काम करीत असतात. ते जेंटलमॅन नेते आहेत, असेही शरद पवार म्हणाले. खऱ्या अर्थाने काम करणारा मंत्री कुणी असेल तर ते म्हणजे नितीन गडकरी, असेही ते म्हणाले.

मदत नुकसानीबाबत नव्या धोरणांची गरज

राज्यातील काही शहरांत हिंसाचार झाला. तो हिंसाचार पोलिसांनी तातडीने नियंत्रणात आणला. मात्र, हिंसाचारामुळे व्यापाऱ्यांच्या दुकानांचे नुकसान झाले. त्याच्या मदत नुकसानीबाबत नव्या धोरणांची गरज आहे. राज्य सरकारने त्यावर विचार करावा, असेही शरद पवार म्हणाले.

हेही वाचा: भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? अनुराग ठाकूरांनी दिले हे संकेत

निषेध रॅलीने वातावरण खराब केले

भाजपने अमरावतीत त्रिपुरा घटनेचा निषेध म्हणून रॅली काढून वातावरण खराब केले. यामुळे मोठे नुकसान झाले. त्रिपुरा घटनेचा निषेध अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये व्हायला नको होता. दंगलीत कुणाचा हात याबाबत पाठवलेल्या अहवालाबाबत काही माहिती नाही. त्रिपुरात जे घडलं त्याचा विरोध दुसरीकडे करण्याची गरज नव्हती. निवडणुकीत फायदा घेण्यासाठी काही लोकांनी याचा फायदा घेतला अशी माहिती आहे. याच्या खोलात जाण्याची गरज आहे, असेही शरद पवार म्हणाले.

loading image
go to top