

Nagpur Rattled by Bogus Labour Registration Scam, Authorities Act
Sakal
नागपूर: इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे होणाऱ्या बोगस कामगार नोंदणी प्रकरणी राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली असून, दलाल व कथित कामगार संघटनांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बोगस नोंदणीच्या माध्यमातून सुमारे ३२ शासकीय योजनांचा गैरफायदा घेतला जात असल्याचे उघड झाल्यानंतर पथकाने कारवाई केली. यात हिंगणा तालुक्यात १३३ तर वर्धा जिल्ह्यात तीन केंद्रावर बोगस प्रमाणपत्र दिले जात असल्याचे दिसून आले.