Gadchiroli News: शेतकऱ्यांच्या समस्या कायम; तलाठ्यांचे आंदोलन, पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टांची सारी पुंजी गेली वाहून

Rains ruin farmers’ efforts: शासनाच्या आदेशानुसार महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायचा होता. पण या संकटकाळातच महसूल प्रशासनाचे हात आंदोलना’च्या बेडीत अडकले आहेत. विदर्भ पटवारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याने समस्या वाढल्या आहेत.
Rains ruin farmers’ efforts; revenue officers’ strike delays compensation process

Rains ruin farmers’ efforts; revenue officers’ strike delays compensation process

Sakal

Updated on

गडचिरोली: यंदा शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. एका बाजूला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टांची सारी पुंजी वाहून नेली, तर दुसऱ्या बाजूला जंगलातून आलेल्या हत्तींच्या कळपाने त्यांच्या उरलेल्या पिकांवरही आक्रमण केले. शेतकऱ्याच्या घरात साठवणुकीची पिशवीही रिकामी आणि बांधावर उभी पिकेही मातीमोल झाली आहेत. शासनाच्या आदेशानुसार महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यायचा होता. पण या संकटकाळातच महसूल प्रशासनाचे हात आंदोलना’च्या बेडीत अडकले आहेत. विदर्भ पटवारी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याने समस्या वाढल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com