तण काढण्यासाठी शेतकऱ्याचे ‘जुगाड’ यंत्र; वेळ अन् खर्चात बचत

तण काढण्यासाठी शेतकऱ्याचे ‘जुगाड’ यंत्र; वेळ अन् खर्चात बचत

गुमगाव (जि. नागपूर) : यंदा कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांसमोर मजूर आणि मजुरीचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतातील उभ्या पिकात तण वाढल्याने ते काढण्यासाठी पुरेशी मजूर मिळत नाहीत. या समस्येवर मात करण्यासाठी हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील प्रयोगशील शेतकरी प्रभाकर आष्टनकर यांनी घरगुती टाकाऊ वस्तूपासून तणनाशक ‘जुगाड’ यंत्र बनविले. या देशी जुगाडातून तणनाशक औषधी फवारताना पिकांना कुठलीही हानी न होता केवळ तणाचा नाश होत असल्याने आष्टनकर यांच्या अनोख्या प्रयोगाची सगळीकडे चर्चा होत आहे. (Farmers-News-Satisfactory-rainfall-Herbicide-spraying-Nagpur-Rural-News-nad86)

शेतमालाचे नुकसान न होता कमी खर्चात अधिक पिके कशी घेता येईल, याकडे शेतकऱ्यांचा सध्या कल आहे. त्यामुळे शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करीत असतात.असाच एक नावीन्यपूर्ण प्रयोग गुमगाव येथील प्रभाकर दौलत आष्टनकर यांनी आपल्या शेतावर केला. कृषीचे शिक्षण घेणारा मोठा मुलगा सचिन आणि लहान मुलगा पंकज यांच्या मदतीने प्रभाकर यांनी घरच्या टाकाऊ वस्तूंपासून तणनाशक फवारणीचे 'जुगाड' बनविले. कोरोना संकटात मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी व पिकाच्या सभोवती वाढणाऱ्या तणापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी हे यंत्र सध्या उपयोगी पडत आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

तण काढण्यासाठी शेतकऱ्याचे ‘जुगाड’ यंत्र; वेळ अन् खर्चात बचत
वावर आहे तर पॉवर आहे : तीन भाऊ, तीन एकर अन् लाखोंची उलाढाल

असे तयार झाले ‘जुगाड’

प्रयोगशील शेतकरी प्रभाकर आष्टनकर यांनी घराच्या अडगळीत पडलेले इलेक्ट्रिक फिटिंगचे काही पाइप घेतले. त्याची फेविक्विकच्या साहाय्याने फिटिंग करून त्याच्या चारही बाजूने जुना बॅनर गुंडाळला. त्या देशी जुगाडाला दोन मजुराच्या हाती देऊन फवारणी पंपाच्या सहाय्याने शेतात तणावर तणनाशक फवारणी केली. या गावठी जुगाडामुळे वेळ आणि पैसे वाचण्याबरोबरच शेतमालावर याचा कोणताच परिणाम झाला नाही. हे गावठी जुगाड विनाउपयोगी असलेल्या घरातीलच वस्तूंची जुळवाजुळव करूनच तयार केल्याचे आष्टनकर यांनी सांगितले.

(Farmers-News-Satisfactory-rainfall-Herbicide-spraying-Nagpur-Rural-News-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com