जमीन पडीक ठेवू, पण सोयाबीन पेरणार नाही! शेतकरी चिंतातुर

जमीन पडीक ठेवू, पण सोयाबीन पेरणार नाही! शेतकरी चिंतातुर

टेकाडी (जि. नागपूर) : तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना (Farmers news) घरगुती सोयाबीन बियाणे (Homemade soybean seeds) वापर, उगवण क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया याची माहिती प्रात्यक्षिक मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी स्वतः जवळील किंवा बाजारातून बियाणे खरेदी केलेले असले तरी त्या बियाण्याची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, याबाबत तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे. मात्र, टेकाडी शिवारातील शेतकऱ्यांनी (Nagpur rural farmers news) यंदा जमीन पडीक ठेवू, पण सोयाबीन पेरणार नाही, असा निश्चय केल्याचे चित्र आहे. (Farmers-said-We-will-keep-the-land-fallow,-but-we-will-not-sow-soybeans)

खरीप हंगामात सोयाबीन पिकाला नगदीचे पीक म्हणून शेतकरी पहात असतो. मात्र, काही वर्षांपासून क्षेत्रातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाला होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन पिकांवर आलेल्या विविध रोग व किडीचा प्रादुर्भाव व अनियमित पावसामुळे पिकाला जबर फटका बसतो. एकरी पाच हजारांच्या घरात खर्च करून बियाणे जमिनीत पेरले तर उगवेल याची शाश्वती घ्यायला कुणी नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

जमीन पडीक ठेवू, पण सोयाबीन पेरणार नाही! शेतकरी चिंतातुर
प्रियकराच्या भेटीसाठी रचले अपहरण नाट्य; अनैतिक संबंधाचा कळस

यथार्थ काढणीस तयार झालेल्या सोयाबीन पिकावर आलेल्या कीड रोगांमुळे फलधारणा न झाल्याने लागवडीचा खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याचे पाहून गतवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी उभ्या पिकात चक्क रोटावेटर फिरविले होते. त्याचेच फलित म्हणून यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पाठ देण्याचे निश्चित केल्याचे निदर्शनास येत आहे. कृषी विभागातर्फे मात्र सोयाबीन बियाणे पेरणी करण्यासाठी शेतीच्या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करायला सुरुवात केली आहे.

चार एकर पैकी दोन एकर शेतात ३५ हजारांचा खर्च करून मागच्या वर्षी सोयाबीनची पेरणी केली होती. अपेक्षा जास्त होती. मात्र, ३५ रुपयांचे देखील पीक हातात आले नाही. म्हणून यंदा संभाव्य नुकसान टाळण्यासाठी चारही एकर शेती पडीक ठेवणार आहे.
- विजय वासाडे, शेतकरी
एकरी पाच हजार रुपये खर्च केला. पुढे सोयाबीन उगवणार की नाही, याची शाश्वती घेणारं कुणी नाही. त्यापेक्षा जमीन पडीक ठेवली ती परवडेल. मागील वर्षी शेतात एक दाणा नाही पिकला. शासकीय मदत म्हणजे फुगा. सोयाबीन उगवलं का नाही, याची दुकानदार ही ‘गॅरंटी’ घेत नाही.
- श्रीकृष्ण वासाडे, शेतकरी
जमीन पडीक ठेवू, पण सोयाबीन पेरणार नाही! शेतकरी चिंतातुर
डोळ्यांना पट्टी बांधून जाणणार नेत्रहीनांच्या वेदना; करणार नेत्रदानाचा संकल्प

पहिल्याच दिवशी आगमन

नांद परिसरात मंगळवारी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवसी पावसाचे आगमन झाले. दुपारी दोन वाजतापासून आकाशात काळेकुट्ट ढगांचा जमाव सुरू झाल्यानंतर अंधार पडला होता. त्यानंतर ३ वाजतापासून मेघगर्जना सुरू होऊन विजांचा जोरदार कडकडाट सुरू झाला. ३:३० च्या सुमारास वाजतगाजत मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावर्षी पावसाळा वेळेत सुरू झाला. पण ‌आज आलेला मुसळधार पाऊस हा अवकाळी असेल की मॉन्सूनचा अशा नागरिकांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

(Farmers-said-We-will-keep-the-land-fallow,-but-we-will-not-sow-soybeans)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com