
नागपूर: राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच मदतनिधी मिळावा, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. ज्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी महसूल विभाग सुट्टीतही काम करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिली.