कोरोना ब्रेकिंग : नागपुरात एकाच दिवशी पाच मृत्यू, एकूण बळी 45 

Five killed a day in Nagpur due to corona
Five killed a day in Nagpur due to corona
Updated on

नागपूर : शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून आज एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेसह शहरातही खळबळ माजली. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 45 पर्यंत पोहोचली असून आज निदान झालेल्या 125 जणांसह बाधितांचा आलेख 2774 पर्यंत पोहोचला. एकाच दिवशी पाच मृत्यू व सव्वाशे बाधितांमुळे आजचा दिवस कोरोनाच्या दहशतीत भर घालणारा ठरला. 

राज्य सरकारने "मिशन बिगीन अगेन'अंतर्गत नागरिकांना लॉकडाउनमध्ये सवलत दिली. तेव्हापासून उपराजधानीत सातत्याने बाधित आणि मृत्यूचा आलेख उंचावत आहे. "मिशन बिगीन अगेन' सुरू होण्यापूर्वी शहरात बाधितांची संख्या चारशेपर्यंत होती. गेल्या दीड महिन्यात 1800 बाधितांची भर पडली. उपराजधानीच्या चिंतेच भर घालणारा सगळा घटनाक्रम सुरू असताना आज दिवसभरात 79 बाधित कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बाबही पुढे आली. 

त्यामुळे आजाराची लागण झाल्यानंतर उपचाराने मात करून घरी परतलेल्यांची संख्याही वाढून 1733 वर पोचली आहे. दरम्यान, कोरोनाची बाधा होऊन शुक्रवारी दगावलेल्या दोघांवर अंबाझरी मार्गावरील वोक्‍हार्ट येथील खासगी कोविड सेंटरमध्ये तर तिघांवर मेयोतील कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाची बाधा होऊन मेयोत दगावलेल्या 3 जणांपैकी एक 34 वर्षीय तरुण कामठी येथील रहिवासी होता. फुप्फुसाशी निगडित आजार झाल्याने दोन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. तर दुसरा कोरोनाबाधित 48 वर्षीय रुग्ण विनोबा भावे नगरातील रहिवासी होता. 

न्यूमोनिया झाल्याने त्याच्यावरही रविवार 12 जुलैपासून उपचार सुरू होते. कोविड-19 ची बाधा होऊन मरण पावलेला तिसरा 70 वर्षीय रुग्ण हा गोळीबार चौकातील रहिवासी होता. या ज्येष्ठ नागरिकावर मंगळवार 14 जुलैपासून कोविड वॉर्डात उपचार सुरू होते. नव्याने बाधा झाल्याचे निदान झालेल्यांमध्ये अँटिजन रॅपिड टेस्टमध्ये सर्वाधिक 33 नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचा अंश आढळला. 

त्यानंतर एम्समधून 21, मेयोतून 19, नीरीच्या लॅबमधून 18, खासगी प्रयोगशाळांमधून 15, जिल्ह्यातील अन्य लॅबमधून 12, माफ्सूतून 6 तर मेडिकलमधून एकाच्या घशातील स्त्राव नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालेल्यांची संख्या 2774 पर्यंत पोचली आहे. 

बिनाकी मंगळवारी नवा हॉटस्पॉट 


आधी सतरंजीपुरा, मोमिनपुरा नंतर नाईक तलाव, बांगलादेश आणि मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झाला होता. आता यात बिनाकी मंगळवारी या नव्या हॉटस्पॉटची भर पडली आहे. या भागातील 25 जणांना आज कोरोनाचे निदान झाले. 

  • दैनिक संशयित- 183 
  • एकूण संशयित- 2749 
  • आजचे कोरोना पॉझिटिव्ह- 125 
  • आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह-2774 
  • दैनिक कोरोनामुक्त- 79 
  • आतापर्यंत कोरोनामुक्त- 1733 
  • कोरोना एक्‍टिव्ह रुग्ण- 996 
  • दैनिक तपासणी नमुने- 2590 
  • आतापर्यंत तपासलेले नमुने- 43679 

    संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com