
नागपूर - रेशीमबाग येथील पुनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये झालेल्या ३ कोटी ४१ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी उपमहापौर, नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त आणि तत्कालीन संचालक रवींद्र ऊर्फ छोटू प्रभाकर भोयर यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता.२२) सकाळी आठ वाजता अटक केली. त्यांची तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष रमन सेनाड यांनी २४ जुलै २०२४ ला आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.