Ram Nath Kovind
esakal
दसरामेळाव्यात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हेडगेवार आणि आंबेडकरांचा जीवनावर झालेला प्रभाव अधोरेखित केला.
संघ गेल्या शंभर वर्षांत वटवृक्षासारखा उभा राहिला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
महिला शक्ती राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावते, असे कोविंद यांनी सांगितले.
नागपूर : महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची आज जयंती आहे, हा एक सुंदर योगायोग आहे. माझ्या जीवनात डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे अमूल्य स्थान आहे. या दोन्ही महापुरुषांमुळे आमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडले, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनी केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष महोत्सवाच्या निमित्ताने दसरा मेळाव्यात बोलत होते.