माग्रस' चळवळीचे संस्थापक सुधीर देव यांचे अल्पशा आजाराने निधन; हैद्राबाद येथे घेतला अखेरचा श्वास   

Founder of MAGRAS Sudhir dev has passes away
Founder of MAGRAS Sudhir dev has passes away

नागपूर : नागपुरच्या माझा ग्रंथ संग्रह  (माग्रस) या वाचक चळवळीचे संस्थापक सुधीर देव यांचे आज दुपारी हैदराबाद येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. "वाचन कमी होत आहे, ही ओरड योग्य नाही. साहित्य दर्जेदार असेल तर ते निश्चितपणे वाचले जाते. ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे." असे त्यांचे म्हणणे होते"  ‘माग्रस’च्या माध्यमातून त्यांनी ते कार्य केले.

२४ आ‌ॅगस्ट १९६८ रोजी सुरू झालेली ही चळवळ पन्नास वर्षे सुरू होती. नागपुरसारख्या ठिकाणी १९६८ मध्ये पुस्तकांची दुकाने अगदी एक दोनच होती. आणि विकत घेऊन पुस्तके वाचणारेही कमीच होते. त्यांना पुस्तके विकत घेण्यासाठी प्रवृत्त करणे हा या चळवळीचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी सदस्यांनी दर महा ठराविक रक्कम जमा करून वर्षाच्या शेवटी त्या रकमेतून त्यांना हवी ती पुस्तके माग्रसच्या माध्यमातून खरेदी करता येत होती. 

माग्रसच्या माध्यमातून सदस्यांची मासिक भेट आणि एक वार्षिक मेळावाही घेतला जाई. नागपुरातलेच नव्हे तर मुंब‌ई पुण्यासह मध्य प्रदेश आणि आजच्या तेलंगणातल्या अनेक गावांतले वाचक आणि बरेच नामवंत साहित्यिकही माग्रसचे सभासद झाले होते. खूप चांगला प्रतिसाद आणि नावलौकिक कमावलेली ही चळवळ देव यांनी सौभाग्यवती अपर्णा देव आणि काही सहकाऱ्यांच्या मदतीने २०१८ पर्यंत सुरू ठेवली. 

२००० नंतर तिचा प्रभाव कमी होत गेला. कारण लोकांजवळ एकरकमी पुस्तक खरेदीसाठी भरपूर पैसेही आले होते आणि पुस्तकांची बरीच दुकानेही निघाली होती. तरीसुद्धा नागपुरच्या सांस्कृतिक इतिहासात १९६८ ते २००० एवढा काळ कार्यरत असणाऱ्या माग्रसचे नाव आवर्जून घ्यावेच लागेल. २०१८ मध्ये अपर्णा देव यांच्या मृत्यूनंतर सुधीर देव हैदराबादला त्यांच्या मुलाकडे जाऊन येऊन राहत होते. प्रकृती अस्वास्थ्यानेही ते बेजार होते.

सुधीर देव कवी आणि चोखंदळ वाचक होते. माग्रस तर्फे त्यांनी अन्य काही कवींचे कवितासंग्रह प्रकाशित केले होते. लिटल् मॅगझिनच्या काळात त्यांनी अक्ष नावाचे एक अनियतकालिक देखील चालवले.

वाचन प्रेमींना एकत्र बांधण्याचे काम
टेक्नॉलॉजी नसतानाच्या  काळात नागपुरातील सर्व लेखकांना, वाचन प्रेमींना एकत्र बांधण्याचे काम श्री. सुधीर देव यांनी केले. 'माग्रस' चे यश केवळ त्यांच्यामुळेच आहे. 
-  वृंदा जोगळेकर 
माग्रस कार्यकर्त्या

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com