esakal | स्वस्त सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्याचे सांगून व्यापाऱ्याची १५ लाखांनी फसवणूक

बोलून बातमी शोधा

Fraud of trader by Rs 15 lakh

तावाडे यांनी पोलिसांत जाण्याची धमकी देताच दोन महिन्यांनंतर ६ लाख ७७ हजार रुपयांचा माल पाठविला. मात्र, उर्वरित माल न पाठविता त्यांची फसवणूक केली. पैसेसुद्धा परत केले नाही. तावाडे यांनी न्यायालयात धाव घेतली. धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

स्वस्त सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्याचे सांगून व्यापाऱ्याची १५ लाखांनी फसवणूक

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : स्वस्त दरात सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्याचे सांगून तीन महिलांनी एका व्यापाऱ्याची १५ लाख ४१ हजारांनी फसवणूक केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मोहन भरतराम तावाडे (वय ३६, रा. मनीषनगर) यांचे धंतोली येथे मोहन इंटरप्रायजेस नावाचे सर्जिकल साहित्याचे दुकान आहे. जुलै २०१७ मध्ये मनीषा राघव गोडघाटे (वय ५१, रा. पवई मुंबई), कीर्ती अशोक जोशी (वय ४७, रा. बदलापूर, ठाणे) आणि नीलम रमेश अडागळे (वय ४७, रा. बदलापूर, ठाणे) या तावाडे यांच्याकडे आल्या. आपल्या कंपनीचे साहित्य स्वस्तात देऊ, असे सांगितले.

तावाडे यांनी ३ जुलै २०१७ रोजी २२ लाख १८ हजार ७४६ रुपयांच्या मालाची ऑर्डर दिली. धनादेशाद्वारे पैसे दिले. मात्र, त्यांनी माल पाठविला नाही. तावाडे यांनी पोलिसांत जाण्याची धमकी देताच दोन महिन्यांनंतर ६ लाख ७७ हजार रुपयांचा माल पाठविला. मात्र, उर्वरित माल न पाठविता त्यांची फसवणूक केली. पैसेसुद्धा परत केले नाही. तावाडे यांनी न्यायालयात धाव घेतली. धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

जाणून घ्या - प्रेम एकीवर अन् साक्षगंध दुसरीशी; विवाहित प्रेयसीवर बलात्कार तर होणाऱ्या पत्नीला दिला दगा

सासऱ्याने केले सुनेशी अश्‍लील चाळे

सुनेशी सासऱ्‍याने अश्‍लील चाळे करीत विनयभंग केला. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी सूर्या पिंगळे (वय ७१) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पिंगळे याच्या मुलाचा २०१७ मध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे सुनेला विम्याचे पैसे मिळाले होते. विम्याच्या पैशातील काही रक्कम वडिलांना देण्यात यावी, असाही आदेश न्यायालयाने दिला.

परंतु, सून सासऱ्‍याला पैसे द्यायला तयार नव्हती. त्यावरून त्यांच्यात वाद होत असे. त्याचप्रमाणे सासरे हे वाईट नजरेने तिच्याकडे पाहून छेड काढत असत, असे सुनेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. स्वयंपाकखोलीत असताना सासऱ्‍याने अश्लील चाळे केले, असे सुनेने तक्रारीत म्हटले आहे. जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.