
नागपूर: मुलीला वडिलांची माया लाभली पाहिजे. तसे झाल्यास मातृत्वा सोबतच पितृत्व देखील लाभते. त्यामुळे जीवनाचे सार्थक होते. आईच्या मायेत करुणा असते; तर, वडिलांच्या मायेतून मुलं कर्तृत्ववान बनतात. हे वाक्य तंतोतंत खरे ठरवत पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांची दत्तक कन्या माला पापळकर हिला केवळ ‘वडिलांचे नावच नव्हे, तर ममत्वही लाभले’ अशी भावना तिने व्यक्त केली.