
नागपूर : आदिवासी व सामाजिक न्याय विभागाचा सातशे कोटींहून अधिकचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळविला. खुद्द समाजकल्याण मंत्र्यानी ते जाहीरपणे कबूल केले. तर, आदिवासी विकास मंत्री सारवासारव करीत आहेत, असा दावा राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी नागपुरात पत्रपरीषदेत केला.