G20 summit 2023 : लोकशाही राजकीय शस्त्र नव्हे तर विकासाचे अस्त्र

डॉ. आर. बालसुब्रमण्यम ः सी-२० च्या चर्चासत्रात नागरी समाजाच्या भूमिकेवर मंथन
G20 summit
G20 summitsakal

नागपूर : लोकशाहीकडे राजकीय शस्त्र म्हणून न पाहता विकासाची गरज म्हणून पाहिले पाहिजे. लोकशाही म्हणजे लोकांना समजून घेणे, लोकशाही म्हणजे विचारांचे लोकशाहीकरण असल्याचे ग्रासरूट्स रिसर्च अँड ॲडव्होकसी मूव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. बालसुब्रमण्यम यांनी मंगळवारी येथे सांगितले.

वर्धा मार्गावरील हॉटेल रेडिसन ब्लू येथे आयोजित सी-२० परिषदेत ‘मानवी विकासाला चालना देण्यासाठी नागरी समाजाची भूमिका’ यावर चर्चासत्र झाले. सत्राच्या अध्यक्षस्थानी कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे होत्या. व्यासपीठावर नेव्हर अलोनच्या सहसंस्थापक गॅब्रिएला राईट, यूएन वूमनमधील आर्थिक सक्षमीकरणप्रमुख मेग जोन्स, सी-२०चे आंतरराष्ट्रीय सल्लागार सदस्य पेड्रो बोका हे वक्ते उपस्थित होते.

डॉ. आर. बालसुब्रमण्यम म्हणाले, मूलनिवासी आणि त्यांचा आवाज हेच लोकशाहीचे खरे निर्माते आहेत. जग उत्पन्नाच्या दारिद्र्याने नाही तर आवाजाच्या गरिबीने त्रस्त आहे. लोकशाही आणि विकास समजून घेण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.संपूर्ण नागरी समाज मानव विकासाच्या कामामध्ये व्यस्त असल्याचे निवेदिता भिडे यावेळी म्हणाल्या.

मेग जोन्स म्हणाल्या, ‘यू आर द लाईट’ अर्थात स्वयंप्रकाशित होणे, हे सी-२० परिषदेचे घोषवाक्य असून आपल्याला स्वयंस्फूर्तीने काम करण्यासाठी प्रेरित करीत आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद पुरेशी नाही. ही तरतूद लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, याची खात्री करणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या

प्रा. भवानी राव यांनी लैंगिक असमानता दूर करणे ही एक महत्वाची समस्या असल्याचे सांगितले. निधी गोयल यांनी दिव्यांगत्व ही एक ज्वलंत समस्या आहे. परंतु अपंग व्यक्तिंना आर्थिक उत्पादकतेत योगदान देणाऱे व्यक्ति म्हणून पाहण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. गॅब्रिएला राईट यांनी वंचितांना सहाय्य करण्याची गरज

G20 summit
Nagpur : महामार्गावर धूर सोडणारी वाहने सुसाट ; वाहतूक पोलिस विभागाचे दुर्लक्ष

व्यक्त करीत समान व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे, असे नमुद केले. ‘मानवता म्हणजे मीच’ ही जाणीव सर्वात मोठी कृती ठरेल, असेही त्या म्हणाल्या. डॉ. बसवराजू आर श्रेष्ठा यांनी भारत लोकशाहीची जननी असल्याचे नमूद करीत लोकशाही मूल्यांना बळकटी देण्याची गरज व्यक्त केली.

G20 summit
Nagpur News: ऑनलाइन फसवणुकीवर लागणार लगाम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com