Gadchiroli Police Help Centre: अवघ्या २४ तासांत उभारले पोलिस मदत केंद्र! १००० सी-६० कमांडो, २५ बीडीडीएस टीमचे परिश्रम

Gadchiroli Police Help Centre: अवघ्या २४ तासांत उभारले पोलिस मदत केंद्र! १००० सी-६० कमांडो, २५ बीडीडीएस टीमचे परिश्रम

नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडतानाच गडचिरोली पोलिसांनी त्यांची रक्तरंजित सावली असलेल्या प्रदेशात आपली स्थिती भक्कम करणे सुरू केले आहे.

Police Help Centre in Gadchiroli: नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडतानाच गडचिरोली पोलिसांनी त्यांची रक्तरंजित सावली असलेल्या प्रदेशात आपली स्थिती भक्कम करणे सुरू केले आहे.

याचाच एक भाग म्हणून हेडरी उपविभागाअंतर्गत असलेल्या गर्देवाडा या अतिदुर्गम परिसरात अवघ्या २४ तासांत पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यासाठी १००० सी - ६० कमांडो, २५ बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलिस जवान, ५०० विशेष पोलिस अधिकारी व खासगी कंत्राटदाराने सहकार्य केले.

माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशील गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद्यांच्या कारवायांना आळा बसावा, यासाठी गडचिरोली पोलिस दलाने सोमवार (ता. १५) हेडरी उपविभागाअंतर्गत असलेल्या गर्देवाडा या ठिकाणी नवीन पोलिस मदत केंद्राची स्थापना केली.

आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका निर्भय व निकोप वातावरणात पार पडाव्यात तसेच या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण सुरक्षा व विकासाला हातभार लागून त्यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता हे पोलिस मदत केंद्र मैलाचा दगड ठरेल. या पोलिस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलिस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकूण १५०० मनुष्यबळ, १० जेसीबी, १० ट्रेलर, ४ पोकलेन, ४५ ट्रकच्या साहाय्याने अवघ्या एका दिवसांत पोस्ट उभारणी करण्यात आली. (Latest Marathi News )

पोलिस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान गर्देवाडा येथील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना सलवार सूट, नऊवारी साडी, पुरुषांना धोतर, युवकांना लोअर पॅन्ट, टी-शर्ट, चप्पल, ब्लॅंकेट, चादर, मुलींना सायकल, नोटबुक, फ्रॉक, कंपास, चॉकलेट, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बैट, बॉल, व्हॉलिबॉल नेट, व्हॉलिबॉल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.

Gadchiroli Police Help Centre: अवघ्या २४ तासांत उभारले पोलिस मदत केंद्र! १००० सी-६० कमांडो, २५ बीडीडीएस टीमचे परिश्रम
RBI: फक्त 5 वर्षांसाठी हाऊसिंग फायनान्स कंपन्यांमध्ये पैसे जमा करता येणार, RBIने नियम केले कडक

या कार्यक्रमास गडचिरोली परीक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक संदीप पाटील, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पोलिस उपमहानिरिक्षक जगदीश मीणा, गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, हेडरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, गर्देवाडा पोलिस मदत केंद्राचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब जाधव, इतर अधिकारी व पोलिस अंमलदार उपस्थित होते.

या आहेत सुविधा...

गर्देवाडा पोलिस मदत केंद्रामध्ये पोलिस दलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, २० पोर्टा केबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल आदींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलिस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलिस दलाचे ४ अधिकारी व ५५ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप ११, डी कंपनी नवी मुंबईचे २ प्लाटून तसेच सीआरपीएफ १९१ बटालियन, डी कंपनीचे १ असिस्टंट कमांडन्ट व ७५ अंमलदार तैनात करण्यात आले आहेत. (Latest Marathi News )

Gadchiroli Police Help Centre: अवघ्या २४ तासांत उभारले पोलिस मदत केंद्र! १००० सी-६० कमांडो, २५ बीडीडीएस टीमचे परिश्रम
Maratha Reservation : मनोज जरांगेंना मुंबईला येण्याची वेळ येणार नाही, राज्य सरकार योग्य वेळी तोडगा काढणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com