Gadkari Reveals Political Pressure on Officers in Government
Esakal
नागपूर
वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान
Nitin Gadkari : सरकारमध्ये काम करताना वरिष्ठ जे सांगतात तेच करायचं असतं. नेत्यांच्या जवळच्या लोकांना कंत्राट देण्याचा दबाव अधिकाऱ्यांवर असतो असंही नितीन गडकरी यांनी म्हटलंय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे सातत्यानं चर्चेत असतात. सरकार आणि प्रशासनातील कार्यपद्धतीवर त्यांनी अनेकदा बेधडक वक्तव्ये केली आहेत. वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना कठोर शब्दात सुनावलं सुद्धा आहे. दरम्यान, आता सरकारमध्ये काम करताना वरिष्ठ जे सांगतात तेच करायचं असतं. त्यावर इकडं तिकडं बघायचं नसतं असं विधान गडकरींनी केलंय. वरिष्ठ जर गाढवाला घोडा म्हणत असतील तर आपणही तो घोडाच आहे असं सांगायचं. कारण बॉस हा नेहमीच करेक्ट असतो असं गडकरी म्हणालेत.

