सीसीटीव्हीच्या बॅटऱ्यांची चोरी करणारी टोळी अटकेत

पोलिसांनी केले तब्बल ३० गुन्हे उघड
सीसीटीव्हीच्या बॅटऱ्यांची चोरी करणारी टोळी अटकेत

नागपूर : शहरातील अनेक भागातून चक्क पोलिसांच्या तिसरा डोळा असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या बॅटऱ्या अचानक चोरी व्हायला लागल्या होत्या. त्यामुळे चोरट्यांनी थेट पोलिसांना आव्हान दिले होते. झोन फोरमधील सायबर युनिटच्या मदतीने सक्करदरा पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. पोलिसांनी तब्बल ३० गुन्ह्यांची उकल केली असून सहा चोरट्यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सक्करदरा, अंबाझरी, सदर, नंदनवन, सीताबर्डी, तहसील, राणा प्रतापनगर आणि बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मनपाने लावलेल्या सीओसीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चार्जींग बॅटऱ्या अचानक चोरी व्हायला लागल्या होत्या. त्यामुळे ठाण्यातील गस्त घालणाऱ्या बीट मार्शलचे पितळ उघडे पडले होते. आतापर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या ३० ठिकाणांवरून बॅटरी चोरी गेल्या होत्या. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात सायबर युनिटचे प्रमुख दीपक तऱ्हेकर यांनी सलग ११ दिवस तांत्रिक तपास केला.

चोरट्यांच्या टोळीचा म्होरक्याला जाळ्यात अडकवले. त्यानंतर टोळीतील चारही चोरट्यांना अटक केली. नितीन रामचंद्र शाहू (अशोक चौक, पाचपावली), मुकेश रामअवतार शाहू (कामनानगर), रितेश शंकर राठोड (कामनानगर), राजकुमार विष्णूप्रसाद शाहू (गोकूलनगर) आणि भंगारविक्रेता संतोष माताप्रसाद शाहू (न्यू बिनाकी मंगळवारी), मोहम्मद इमरान अन्सारी (पाचपावली) अशी अटकेतील टोळीचे नाव आहे. टोळीकडून ३ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सक्करदरा ठाण्याचे एपीआय सागर आव्हाड, बाळू गिरी, नितीन राऊत, हेमंत ऊईके, कपिल राऊत आणि सायबरचे दीपक तऱ्हेकर यांनी केली.

सीसीटीव्हीच्या बॅटऱ्यांची चोरी करणारी टोळी अटकेत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर ; एका वाणिज्य महाविद्यालयात एमबीए झालेल्या प्रार्चायाची नियुक्ती

तक्रारी पण गुन्हे दाखल नाही

शहरातून अनेक भागातून सीसीटीव्हीच्या बॅटरी चोरी गेल्या आहेत. मनपाच्यावतीने पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिले आहेत, परंतु ठाणेदारांना गांभीर्य न दाखवता गुन्हेच दाखल केले नाहीत. फक्त ठाणेदारांच्या हलगर्जीपणामुळे पोलिसांची तिसरा डोळा आंधळा झाला होता. जर पोलिसांनी वेळीच दखल घेऊन गुन्हे दाखल केले असते तर टोळी पकडल्या गेली असती, अशी चर्चा आहे.

भंगारविक्रेत्यांनी केला ‘गेम’

बॅटरीमध्ये असलेले महागडे शिसे नावाचा धातू स्वस्तात मिळविण्यासाठी भंगारविक्रेता मो, इमरान अन्सारी, मुकेश शाहू आणि राजकुमार शाहू आणि संतोष शाहू यांनी बॅटरी चोरीचा प्लान केला. या भंगारविक्रेत्यांनी आतापर्यंत शंभरावर बॅटऱ्या चोरल्या आणि फोडून त्यातून शिसे काढले होते. या भंगार विक्रेत्यांना पाचपावली आणि यशोधरानगर ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांचा आशिर्वाद होता, अशी माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com