Gharkul Yojana : मॅडम तुम्ही वस्तीला भेट दिली की, घर मिळेल! मांग गारुडी समाजाला घरकुलांचा लाभ

रस्त्यावर कचरा वेचून आयुष्य झोपड्यांमध्ये काढणाऱ्या मांग गारुडी समाजातील लोकांच्या आसपासही घरकुलाचे स्वप्न भटकत नव्हते. मात्र अलीकडे त्यांनीही घरकुलाच्या स्वप्नांचा पाठलाग करणे सुरु केले आहे.
gharkul scheme for mang garudi community sukeshini telgote dr siddharth gaikwad nagpur
gharkul scheme for mang garudi community sukeshini telgote dr siddharth gaikwad nagpurSakal

नागपूर : रस्त्यावर कचरा वेचून आयुष्य झोपड्यांमध्ये काढणाऱ्या मांग गारुडी समाजातील लोकांच्या आसपासही घरकुलाचे स्वप्न भटकत नव्हते. मात्र अलीकडे त्यांनीही घरकुलाच्या स्वप्नांचा पाठलाग करणे सुरु केले आहे. ‘त्या’ मॅडम वंचितांच्या वस्तीत आल्या की, घरकुल मिळते, असा विश्वास या समाजात निर्माण झाला आहे.

येथील वंचितांनी केबिन समोर उभे राहून रमाई घरकुलाचे लाभ देणारी रमाई म्हणून त्यांना वस्तीभेटीसाठी निमंत्रण दिले. त्या महिला अधिकाऱ्यांनी देखील तत्काळ त्यांचे निमंत्रण स्वीकारले. मांग गारुडी समाजाच्या वस्तीला भेट दिली. त्या महिला अधिकारी म्हणजे सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे.

नुकतेच मांग गारुडी समाजातील ‘टोली’ वस्तीमधील शंभरावर नागरिकांना रमाई घरकुलाचा लाभ मिळाला. यात सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड आणि सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांचा मोलाचा वाटा आहे.

यामुळे मांग गारुडी नागरिकांना रमाई घरकुल आपल्यालाही मिळू शकते असा विश्वास निर्माण झाला आणि ‘मॅडम तुम्ही आमच्या वस्तीत या, आम्हालाही घरकुल द्या, अशी विनवणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाजबांधव सामाजिक त्यांच्या कार्यालयासमोर उभे राहतात.

मॅडमने वस्तीला भेट देण्याची वेळ निश्चित केली की, आता आपल्याला रमाई घरकुल मिळेल असे ठाम मत ते चक्क बोलून दाखवतात. नुकतेच सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त तेलगोटे यांनी कन्हान परिसराची पाहणी केली.

येथील सतरापूर वस्तीतील लोकांचे अर्ज घेतले आणि येथील १०५ लोकांना घरकुल मंजूर करण्यात आले. एमजीनगरमधील ३५ लोकांचे अर्ज मंजूर झाले. सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक आयुक्त यांनी मोहीम राबवली. सतरापूर, एमजीनगरातील नागरिकांनी सामाजिक न्याय विभागाचे आभार मानले.

‘सकाळ’ने घेतला होता पुढाकार

संविधान साहित्य संमेलनात वंचितांच्या प्रश्नावर खुली चर्चा आयोजित करण्यात आली होती. यासाठी सकाळने पुढाकार घेतला होता. यानंतर सातत्याने टोली राहाटेनगर व इतर मांग गारुडी वस्तीतील नागरिकांना रमाई घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी सकाळने वृत्त मालिकेतून पाठपुरावा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com