'दुपारपर्यंत आमच्याशी बोलला अचानक रात्री मुत्यू कसा?' नातेवाईकांचा डॉक्टरांविरोधात संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'दुपारपर्यंत आमच्याशी बोलला अचानक रात्री मुत्यू कसा?' नातेवाईकांचा डॉक्टरांविरोधात संताप

'दुपारपर्यंत आमच्याशी बोलला अचानक रात्री मुत्यू कसा?' नातेवाईकांचा डॉक्टरांविरोधात संताप

अमरावती ः शहरातील कोविड रुग्णालयात उपचार घेताना मृत्यूमुुखी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यानंतर बऱ्याच घटनांमध्ये मृतांच्या नातेवाइकांच्या रोषाचा सामना येथील डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

बाहेरच्या जिल्ह्यातील एका रुग्णाला मंगळवारी (ता. 27) उपचाराकरिता येथील शासकीय कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी (ता. 29) या रुग्णाने दुपारी दोन वाजेपर्यंत मित्र व नातेवाईकांसोबत मोबाईलवर संभाषण केले. काहींसोबत चॅटिंगही केली. परंतु अचानक त्या रुग्णालयात गुरुवारी रात्री आठच्या सुमारास मृत्यू झाला.

त्याची माहिती नातेवाइकांना देण्यात आली. त्याच मुद्यावरुन रुग्णांचे नातेवाईक शुक्रवारी (ता. 30) अमरावती पोचले. त्यांनी थेट रुग्णालय गाठून दुपारी बोलणाऱ्या रुग्णाचा अचानक रात्रीतून मृत्यू कसा झाला. याबाबत डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना जाब विचारला. रुग्णाचा मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप सुद्धा नातेवाइकांनी केला.

वातावरण तापत असल्याचे बघून रुग्णालय प्रशासनाने घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय यादव हे रुग्णालयात दाखल झाले.

संपादन - अथर्व महांकाळ

टॅग्स :Amravati