92 दिवसांपासून मुलींच्या प्रेमाला बाप पारखा

The girls have not met the father for 92 days
The girls have not met the father for 92 days
Updated on

नागपूर : जन्म देणारी जशी आई प्रेमळ असते. तर बाप हा घरट्याचा पाया मजबूत ठेवण्यासाठी आयुष्य झिजवतो. अशाच हा "बाप', मेडिकलमध्ये सफाई कामगार आहे. आपल्या सोन्यासारख्या मुलींचे आयुष्य घडवण्यासाठी कोरोनाच्या आणिबाणीच्या संकटात तब्बल 92 दिवसांपासून कुटुंबापासून दूर आहे. कोरोना योद्धा म्हणून लढत असताना मेडिकलच हाच त्याचा मुक्काम पोस्ट बनले. आपल्या लेकरांच्या आयुष्यात उजेड पेरण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची पर्वा न करता हातात झाडू घेऊन कोरोना वॉर्ड स्वच्छ करतो. कोरोनाची झळ कुटुंबापर्यंत पोहचू नये, ही मनातील भावनां व्यक्त करताना त्याच्या डोळ्यातून गालावर घळाघळा अश्रू वाहत होते. स्वतःचा वाढदिवस तो लेकरांसोबत साजरा करू शकला नाही. लेकीच्या वाढदिवसाला घरी गेला नाही. 


लेकींच्या आयुष्याला आकार देण्यासाठी झिजणाऱ्या त्या बापाचे नाव अशोक करोसिया. रामनगरातील हिलटॉप परिसरात करोसिया कुटुंब राहतात. तब्बल 92 दिवसांपासून कोरोना वॉर्डात सेवा देणारे स्वच्छतादूत अशोक यांच्याशी फादर्स डेचे निमित्त साधून संवाद साधला. आई, बाबा, पत्नी "आशी' आणि "पायल' या दोन मुली अशा सहा जणांच्या कुटुंबाचा भार सांभाळणारे स्वच्छता दूत अशोक. मेडिकलची स्वच्छता करतानाही आपल्या दोन्ही मुलींना डोळ्यात शिक्षणाचे स्वप्न पेरण्याचं काम अशोक यांनी केले. अल्प वेतनात कुटुंबाचा गाढा ओढताना प्रचंड त्रास होता.

कोरोना क्षेत्रातून आल्यामुळे अनेकजण नाते विसरून गेले, मात्र हा स्वच्छता दूत कोरोना योद्धा म्हणून तब्बल 92 दिवसांपासून घरी गेले नाही. पाच किलोमीटर अंतरावर घर असूनही घरातील लोकांपासून दूर असल्यानंतर होणाऱ्या वेदना सहन करीत आहे. आठ तासांचे कर्तव्य संपल्यानंतर मुली, पत्नी आणि आईबाबांशी बोलताना नकळत डोळ्यात अश्रू येतात. मात्र अश्रूंना आवरत घरच्यांना धीर देण्याचं काम बाप करीत आहे. वडिलांच्या या त्यागामुळेच या दोन्ही मुलींनी आमच्या बाबांची किमयाच न्यारी, असे सांगत, आम्ही आमच्या बाबांची मुले आहेत, असे निर्धाराने सांगतात. 


रात्रभर रडूनही चेहऱ्यावर "मुस्कान' 
मुली या बापाच्या खुपच लाडक्‍या असतात. म्हणूनच या मुलींशी संवाद साधताच आमचा रिअल हिरो आमचा बाप आहे, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मोबाईलवर संवाद ऐकणारा अशोक भावनाविवश झाला. शुक्रवारी मुलींसोबत वाढदिवस साजरा करता आला नाही, याचे दुःख बाळगून रात्रभर रडत असणाऱ्या अशोकने आशी आणि पायल या दोन्ही मुलींशी संवाद साधताच चेहऱ्यावर आपोआपच "मुस्कान' आली. लहान मुलीला प्रेमाने ते "मुस्कान' म्हणतात. या दोन्ही मुली हडसमध्ये नववी आणि सहावीला शिकत आहेत, असे सांगत अशोकने "पीपीई' घालून कोविड हॉस्पिटलमध्ये प्रवेश केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com