
MoU signed in presence of CM for world-class tourism project at Koradi, boosting Nagpur’s global tourism potential.”
Sakal
नागपूर: कोराडी येथे पर्यावरणीय पर्यटन स्थळ (ईको टुरिझम) विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाजेनकोची २३२.६४ हे. आर. जागा एनएमआरडीएला ३० वर्षांच्या भाडे करारावर भाडेपट्ट्यावर हस्तांतरित करण्यात येणार आहे.