esakal | मेडिकल-मेयोला विराफिनची प्रतीक्षा; पण, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शवरच मिळणार इंजेक्शन

बोलून बातमी शोधा

corona updates

मेडिकल-मेयोला विराफिनची प्रतीक्षा; पण, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शवरच मिळणार इंजेक्शन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्र सरकारकडून झायडस कॅडिलाच्या 'विराफिन' औषधाला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी 'विराफिन' औषधाला देशातील शिखर संस्था असलेल्या ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. सात दिवसांत कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा दावा देखील करण्यात आला. मात्र, अद्याप नागपुरातील मेयो, मेडिकल, एम्समध्ये 'विराफिन' पोहचले नसल्याची माहिती आहे.

हेही वाचा: कोरोना रुग्णांसाठी देवदूत ठरले लाखनीचे युवक; ऑक्‍सिजन सिलिंडरची केली व्यवस्था

मुंबईत राज्याच्या टास्क फोर्सचे प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांनी या औषधाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील संबंधित विभागाशी संपर्क केला. 'विराफिन' अद्याप मेडिकल, मेयोत पोहोचले नाही अशी माहिती प्राप्त झाली. या औषधाचा वापर अद्याप सुरू झाला नसल्याचेही सांगण्यात आले. कोरोना प्रादुर्भावामुळे चिंताजनक स्थितीत असलेल्या देशातील २५० रुग्णांना विराफिन देण्यात आले. त्यापैकी १० रुग्ण मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील होते. या रुग्णांना विराफिन हे इंजेक्शन दिल्यानंतर ऑक्सिजनची गरज कमी झाल्याचंही वैद्यकीय संचालक डॉ. लहाने यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून पुढे आले. यामुळे 'विराफिन' इंजेक्शन नागपुरात कधी पोहोचेल याची प्रतिक्षा येथील रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये आहे. नागपुरात कोणालाही हे इंजेक्शन दिले नाही. यामुळे याच्या परिणामांची माहिती सांगता येत नसल्याने मेडिकल, मेयोतील तज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा: वॉर्डबॉयनेच चोरले रेमडेसिव्हीर इंजेक्शन, कारागृहात रवानगी

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शवरच मिळणार -

विराफिनचे इंजेक्शन नागपुरात अद्याप आले नाही. मात्र, एकट्या विराफिन औषधाने कोरोनाचे हे संकट संपत नाही. उपचारातील गुंता कमी होण्याचे संकेत आहेत. मात्र, अद्याप उपराजधानीतील सरकारी रुग्णालयात हे औषध पोहोचले नसून डॉक्टरच्या प्रिस्क्रिपशनवरच हे औषध रुग्णांना दवाखान्यात किंवा विशेष उपचार संस्थानांमध्ये मिळणार आहे.