esakal | सोन विकत घेण्यासाठी पहा सोनेरी स्वप्न; सोने @ 54 हजार 400 रुपये, वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

Gold fifty four thousand four hundred rupees

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहत आहे. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. कोरोना आणि अमेरिका-चीन संघर्ष यांच्यातील संघर्षातून उद्भवलेल्या भौगोलिक-राजकीय तणावातून सराफा बाजारात सुरक्षित गुंतवणूक केली जात आहे.

सोन विकत घेण्यासाठी पहा सोनेरी स्वप्न; सोने @ 54 हजार 400 रुपये, वाचा सविस्तर...

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : सोने आणि चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांत सतत वाढ होत आहे. आज सोने प्रति दहा ग्रॅम 54 हजार 400 रुपयांवर पोहोचला असून, उच्चांकी पातळी गाठली आहे. चांदीच्या दरातही विक्रमी वाढ होऊन प्रति किलो 65 हजार 300 रुपयांवर पोहोचली आहे. चांदी प्रति किलो 3,800 रुपये तर सोने 2,100 रुपयांनी वधारले. 

कोरोनामुळे देशात लॉकडाउन सुरू झाले आणि सोन्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्यात सुरुवात झाली. दिवसेंदिवस किंमती वाढत असल्याने सामान्यांना सोने विकत घेणे अवाक्‍याच्या बाहेर झाले आहे. लॉकडाउनमुळे लग्न समारंभावर काही अटी लादण्यात आल्या आहेत. लग्नात पन्नास लोकांच्यावर नागरिकांना सहभागी होता येत नसल्याने गरिबांसाठी ही वेळ चांगली असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - तिला माहीत होतं आपण मरणार; तरी नियतीला शरण न जाता मिळवले 75 टक्के; मात्र, कौतुक ऐकण्यासाठी ती आज नाही...

कमी खर्चात चांगल लग्न करण्याची ही वेळ आहे. यामुळे वेळ आणि पैसा दोघांचीही बचत होणार आहे. हे बोलण जितकं सोप आहे करणे तितकेच कठीण आहे. कारण, सोन्याच्या दागिणांशिवाय लग्न शक्‍य नाही. हाताला काम नाही अन्‌ जवळ पैसा नसल्याने लग्न कराव कस हा प्रश्‍न कायम असताना सोन्याच्या दागिनांचा दर गगणाला भिडत आहे. यामुळे लग्न कराव तरी कस हा प्रश्‍न उभा आहे. 

सोन्याच्या किंमतीचे मागील सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. एमसीएक्‍सवर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 51,833 रुपयांवर पोहोचला आहे. लवकरच ते 52 हजारांच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याने 1,944 डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडला आहे. हा एक नवीन विक्रम आहे.

क्लिक करा - अमरावतीत हे चाललंय काय! पोलिसच पोलिसांपासून नाही सुरक्षित; उघडकीस आली 'ही' धक्कादायक घटना...

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहत आहे. म्हणूनच सोन्याच्या किंमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. कोरोना आणि अमेरिका-चीन संघर्ष यांच्यातील संघर्षातून उद्भवलेल्या भौगोलिक-राजकीय तणावातून सराफा बाजारात सुरक्षित गुंतवणूक केली जात आहे. 

भविष्यात 85 हजारांच्या पार 
कोरोनाच्या अस्थिरतेच्या वातावरणात सुरक्षित गुंतवणूक म्हणून नागरिक सोन्यामध्ये गुंतवणूक करीत आहे. भविष्यात सोने 85 हजारांचा आकडा पार करेल. 
- राजेश रोकडे, 
संचालक, रोकडे ज्वेलर्स

ठळक बातमी - व्वा रे पठ्ठे... मजूर मिळत नसल्याने तण काढण्यासाठी शेतकऱ्याने लढवली ही शक्‍कल...

दराचा आलेख 

वर्ष  सोने (दहा ग्रॅम) चांदी (एक किलो)
2011 27,000 55,600
2017  30,900  41,465
2018 32,600 40,030
2019 33,500 40.500 
2020  54,400 65,300


लग्न करण माझ्यासाठी तरी कठीण 
मी गरीब आहे. दोन मुली आहेत. हात मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतो. लॉकडाउनमध्ये लग्न केले तर कमी खर्चात काम होईल. मात्र, सोन्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने लग्न करणे शक्‍य होत नाही आहे. हीच स्थिती जवळपास वर्षभर राहणार असल्याने लग्न करण माझ्यासाठी तरी कठीण जाणार आहे. 
- नागरिक 

संपादन - नीलेश डाखोरे 

loading image