Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, चांदीला लकाकी

सोन्याची आतापर्यंतची ही विक्रमी वाढ आहे. सोन्यात आज ४०० रुपयांहून अधिकची वाढ झाली. आतापर्यंतच्या सर्वोच्च दराने व्यवहार झाले.
gold silver rate 71500 and 82400 on eve of gudi padwa festival new year
gold silver rate 71500 and 82400 on eve of gudi padwa festival new yearSakal

नागपूर : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सोन्या-चांदीच्या दराने नवीन विक्रम केला आहे. शहरात सोन्याने प्रथमच ७१ हजार ५०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या नेत्रदीपक वाढीनंतर चांदी प्रतिकिलो ८२ हजार ४०० रुपये झाली आहे. चांदीच्या दरात आज सरासरी एक हजार रुपयांची वाढ झाली. दोन्ही धातूंनी नवा उच्चांक गाठला आहे.

सोन्याची आतापर्यंतची ही विक्रमी वाढ आहे. सोन्यात आज ४०० रुपयांहून अधिकची वाढ झाली. आतापर्यंतच्या सर्वोच्च दराने व्यवहार झाले. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्यतृतीया सण दहा मे रोजी आहे. तेव्हाही सोन्याची मागणी वाढते.

किमतीत प्रचंड वाढ झाल्याने यावेळी सोन्या-चांदीची नाणी किंवा दागिने कसे खरेदी होतील. याची चिंता दागिने खरेदीदारांना सतावत आहे. अक्षय्य तृतीयेचा मुहूर्ताला सोने, चांदी आणि इतर वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते.

सोन्या-चांदीच्या किमती वाढल्याने ग्राहकांकडून गुंतवणूक केली जात आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या खरेदीचा संकल्पही अनेकांनी केला. त्यामुळे रविवारी सराफा बाजारात दागिने बुकिंगसह इतरही वस्तू घेण्यासाठी गर्दी केलेली आहे.

चांदी हजार रुपयांनी महागली

चांदीची चमक आज कमालीची वाढली. सकाळी दुकाने उघडताच १००० रुपयांनी दरात वाढ झाली. त्यामुळे चांदी ८२ हजारांच्या पल्याड गेली. ती आतापर्यंतची उच्च पातळी आहे.

सोन्याचे दर वाढलेले असले तरी ग्राहकांकडून गुढीपाडव्याला सोन्याची खरेदीचा वेग वाढलेला आहे. गुडीपाडव्याच्या निमित्ताने विक्रमी सोन्याच्या दागिन्यांसह चांदीचीही खरेदी होण्याची संकेत सध्याच्या बाजाराच्या स्थितीवरून दिसून येत आहे. मुहूर्ताच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.

- आशिष लेले, संचालक, लेले ज्वेलर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com