Cyber Fraud: सायबर गुन्हेगारीसाठी वापरले युवकांचे बॅंक खाते; १ कोटी ७३ लाखाचा व्यवहार उघड, दोघांना अटक
Online Gaming Money Laundering: गोंदियातील दहा युवकांच्या खात्यांचा वापर करून सायबर फसवणूक आणि हवाला व्यवहारांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. नागपूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागपूर : सायबर फसवणूक, हवाला आणि ऑनलाइन गेमींगच्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी गोंदियातील दहा युवकांच्या खात्याचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.