Good luck with the match and Prashant Billionaire
Good luck with the match and Prashant Billionaire

नशीबाने दिली साथ आणि प्रशांत झाला कोट्यधीश

Published on

नागपूर : सहा रुपयांत कोट्यधीश होण्याचे स्वप्न प्रशांत कुमार यांच्या आयुष्यात वास्तवात उतरले आहे. त्यांना नशिबाने त्यांना साथ दिली आणि लॉटरी लागली आहे. आता प्रशांत अर्धवट राहिलेली अनेक स्वप्ने पूर्ण करणार आहे. यात मुलांच्या शिक्षणासह संसारासाठी लागणाऱ्या भौतिक सुखांचा समावेश असेल. ही त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी मोठी भेटच आहे, असे मत प्रशांतने व्यक्त केले.


शासकीय नोकरीत असलेल्या प्रशांत यांना विकली लॉटरीच्या माध्यमातून आपले भाग्य उजळण्याची संधी मिळाली. कोट्यधीश होण्याचा बहुमान पटकावणाऱ्या प्रशांतला "मैने प्यार किया फेम' भाग्यश्री आणि नागालॅंड स्टेट लॉटरीचे संचालक झोथिसा यांच्या उपस्थितीत एक कोटीचा धनादेश देण्यात आला. फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
भारतातील लॉटरी क्षेत्रातील मोठी ओळख म्हणून या कंपनीने आपला ठसा उमटवला आहे. गेल्या चार वर्षांपासून मी कोट्यधीश होईन, या आशेवर होतो. त्यासाठी नियमितपणे लॉटरीचे तिकीट विकत घ्यायचो. तिकिटाची सहा रुपये किंमत खिशाला परवडणारी होती. याच सहा रुपयांनी माझे नशीब पालटले. करोडपती होण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाल्याचे प्रशांतने सांगितले. दरम्यान, मकरसंक्रांती बंपरचा विजेता रामास्वामी यालाही एक कोटीचा धनादेश देण्यात आला. यावेळी नागपूरचे लॉटरी विक्रेते महेशकुमार साहू, अनिल जैन, चार्ल्स मार्टिन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com