

Historic Tiger Census: Nagpur Regional Forests Record 42 to 45 Tigers
sakal
नागपूर : नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच झालेल्या अधिकृत व्याघ्र गणनेचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या भागात अंदाजे ४२ ते ४५ वाघांची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने यंदा देशपातळीवर व्याघ्र गणना केली. त्याअंतर्गत नागपूर प्रादेशिक वनांमध्ये या नोंदीमुळे नागपूरच्या प्रादेशिक जंगलांमधील वन्यजीव समृद्धीवर शिक्कामोर्तब झाले आहे.