प्रेमासाठी वाट्‍टेल ते...! नातीनेच प्रियकराच्या मदतीने केला आजीचा खून

प्रेमासाठी वाट्‍टेल ते...! नातीनेच प्रियकराच्या मदतीने केला आजीचा खून

नागपूर ः बारावीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आजीचा निर्दयीपणे गळा चिरून खून केला. (Nagpur news)आजीचे दागिने आणि पैसे घेऊन पळ काढला. या हत्याकांडाचा छडा पोलिसांनी (Nagpur Police) छडा लावला. चौघांना पोलिसांनी अटक केली असून मास्टरमाईंड नात आणि तिचा प्रियकर फरार आहे. विजयाबाई पांडुरंग तिवलकर (६२, सप्तकनगर) असे खून झालेल्या वृद्ध आजीचे नाव आहे. निलेश पौनीकर (१९, बिनाकी मंगळवारी), बाबा उर्फ कादीर जाकीर खान (१८, वांजरा ले आऊट, गुलशननगर), हरिश जाकीर अंसारी (२०, यादवनगर) आणि मोहम्मद कमरे आलम (१९, परवेशनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Grand daughter kill grand mother in Nagpur)

प्रेमासाठी वाट्‍टेल ते...! नातीनेच प्रियकराच्या मदतीने केला आजीचा खून
आयकर अधिकाऱ्याचा महिला डॉक्टरवर बलात्कार; व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजयाबाई यांचे पती राज्य राखीव पोलिस दालत होते. कर्तव्यावर असताना त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे विजयाबाईला राज्य राखीव पोलिस बलात कुक म्हणून नोकरी मिळाली होती. विजयाबाईला यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. मुलगाही राज्य राखीव पोलिस बलात नोकरीला असून दोन्ही मुलींचे लग्न झाले आहेत. सुनेसोबत पटत नसल्याने विजयाबाई या सप्तकनगर येथे एकट्याच राहत होत्या.

विजयाबाईच्या मोठ्या मुलीची मुलगी रिया (बदललेले नाव) हिचे फैजान नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. नागपुरातून पळून जाऊन कुठेतरी घर घेऊ, तेथे सुखाने संसार करू, असे दोघांनीही ‘सैराट’ सारखे सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी पैसा लागेल, म्हणून आजीचा काटा काढून पैसा मिळविण्याचा कट दोघांनी आखला. त्यानंतर १२ मे दोघांनीही खुनाची योजना आखली. या खुनात फैजानने त्याच्या अन्य चार मित्रांना सहभागी करून घेतले. लुटीच्या मालाची बरोबर वाटणी करण्याचे त्यांच्यात ठरले होते.

आजीच्या घरात मुक्काम

१४ मे रोजी रियाने आजीला फोन केला आणि मुक्कामी येत असल्याचे सांगितले. रात्री नऊच्या सुमारास फैजानने रियाला आजीच्या घरी सोडले. रात्रीला नातीची विचारपूस केल्यानंतर विजयाबाई झोपी गेल्या. रात्री एकच्या सुमारास फैजान आपल्या साथीदारांसह विजयाबाईच्या घरी आला. ठरल्याप्रमाणे रियाने दरवाजा उघडला. झोपेत असलेल्या आजीच्या गळ्यावर चाकूने वार केले. आजी मृत झाल्याची खात्री होताच आरोपींनी घरातील कपाट फोडले. कपाटातील सोने आणि पैसे घेऊन आरोपी पळून गेले.

आयुक्तांना गवसला धागा

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळाची पाहणी करताच त्यांना हत्याकांडाचा धागा गवसला. त्यांनी लगेच पीआय युवराज हांडे यांना कुणीतरी नातेवाईकच आरोपी असल्याचे सांगून तपासाला दिशा दिली. लगेच पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. त्यामुळे २४ तासांत आरोपींना अटक केली.

प्रेमासाठी वाट्‍टेल ते...! नातीनेच प्रियकराच्या मदतीने केला आजीचा खून
कोरोनाची तिसरी लाट थांबवायची असेल तर झोपडपट्ट्यांवर नजर ठेवण्याची गरज; वैद्यकीय तज्ज्ञांचं मत

असा लागला छडा

विजयाबाईचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला. त्या मोबाईलवर शेवटचा कॉल नात रियाचा होता. त्यावरून पोलिसांनी नातीच्या मोबाईलचा सीडीआर काढला. त्यात तिच्या मोबाईलवरून बाबा उर्फ कादीर यास फोन केल्याचे समजले. त्यावरून पोलिस बाबाच्या मागे होते. पोलिस बाबाच्या मागे असतानाच निलेशची माहिती पोलिसांना समजली. त्यावरून रविवारी पोलिसांन निलेश आणि अन्य दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिली. दोघांना अटक करताच रिया आणि फैजान यांनी नागपुरातून पळ काढला.

(Grand daughter kill grand mother in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com