esakal | नात्यास काळिमा! आजोबांनीच केला नातीवर बलात्कार.. नागपूरच्या नंदनवनमधील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Grandfather misbehave with grand daughter in nagpur

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत १४ वर्षीय मुलगी रीया (बदललेले नाव) ही आठवित शिकते. गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे शाळेला सुट्ट्या लागल्याने रिया नंदनवनमध्ये राहणाऱ्या आजीकडे राहायला आली होती.

नात्यास काळिमा! आजोबांनीच केला नातीवर बलात्कार.. नागपूरच्या नंदनवनमधील घटना

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : पाहूणी म्हणून घरी आलेल्या १४ वर्षीय नातीला नराधम आजोबाने आपल्या वासनेचा बळी बनवले. तिच्यावर सलग सहा महिने बलात्कार केला. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी आजोबाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत १४ वर्षीय मुलगी रीया (बदललेले नाव) ही आठवित शिकते. गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे शाळेला सुट्ट्या लागल्याने रिया नंदनवनमध्ये राहणाऱ्या आजीकडे राहायला आली होती. आईची प्रकृती ठिक राहत नसल्यामुळे रियाच्या आईने आजीकडे आणून सोडले होते. 

जाणून घ्या - केसात कोंडा होतोय? आता घाबरू नका.. तुमच्या रोजच्या वापरातील या वस्तू ठरतील रामबाण उपाय...नक्की वाचा

१४ मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास झोपेत असलेल्या रियाशी ५५ वर्षीय आजोबा हनुमान याने अश्‍लिल चाळे केले. ती खळबडून जागी झाली. तिने आजोबाला विरोध केला. प्रतिकार झुगारून हनुमान याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी दुपारी आजी दवाखाण्यात गेली असताना हनुमानने रियाला घरात एकटे बघितले. त्याने रियाशी अश्‍लील चाळे केले. 

तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिला मारहाण केली. तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आजीला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या रियाने घडलेली घटना सांगितली नाही. आजोबाने हिच संधी साधून रियावर बलात्कार करणे सुरू केले. आजोबाच्या अत्याचारामुळे रिया तणावात राहू लागली. तर दुसरीकडे हनुमान वारंवार रियाचे लैंगिक शोषण करीत होता. लॉकडाऊन असल्यामुळे रिया आजीकडे अडकली होती. नाईलाजास्तव रिया आजोबाचा अत्याचार सहन करीत होती.

वडीलांना पाहताच रियाने फोडला हंबरडा

आई आणि वडील १९ ऑगस्टला रियाला भेटायला आले. वडीलांना पाहताच रियाने मोठ्याने हंबरडा फोडला. वडीलांनी तिला कवेत घेतले आणि आस्थेने विचारपूस केली. रियाने आजोबाने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. वडीलाचा पारा चढला. त्यांनी पत्नीशी चर्चा करून पोलिस स्टेशन गाठले.

असे का घडले? - पती, मुलांना श्रद्धांजली वाहून ‘तिने’ संपवले जीवन, वाचा नेमके काय झाले

आजोबाला अटक 

रियाला अनेकदा आजोबाने मारहाण केली त्यानंतर बलात्कार केला. तिला जीवे मारण्याची धमकी दिली. वडील येण्याच्या एका दिवसांपूर्वीच बलात्कार केला होता. त्यामुळे ती भेदरलेली होती. पोलिसांनी लगेच आरोपी आजोबाला अटक केली.


संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top