Nagpur Crime : उपराजधानीत वाढतोय नशेचा बाजार; गांजा, एमडीच्या तस्करीत वाढ

तरुणाईमध्ये ‘नशा’ची क्रेझ वाढत आहे. स्वस्तात मस्त असा गांजा सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने तरुणाईभोवती नशेचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे.
Nagpur Drugs Addiction
Nagpur Drugs AddictionSakal

नागपूर - तरुणाईमध्ये ‘नशा’ची क्रेझ वाढत आहे. स्वस्तात मस्त असा गांजा सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने तरुणाईभोवती नशेचा विळखा वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे गेल्या दीड वर्षात नागपुरात एमडी तस्करी वाढली असून, १० महिन्यांमध्ये गांजा आणि एमडीच्या तस्करीमध्ये १४१ प्रकरणांची नोंद करण्यात आली. या प्रकरणांमध्ये १९८ जणांना अटक करण्यात आली.

नागपुरात मुंबई-पुण्याप्रमाणे नाईट कल्चर वाढल्याचे चित्र दिसून येते. त्यातून पब, बारमध्ये तरुणाई दारूच्या नशेत झिंगताना दिसते. दारूच्या नशेला जोड म्हणून अनेक तरुण अंमली पदार्थांचा आधार घेतात. त्यात गांजा, गर्द, चरस आणि एमडीचा समावेश होतो.

गेल्यावर्षी अंमली पदार्थविरोधातील पथकाने केलेल्या कारवाईत ४०४ प्रकरणात ३ कोटी ४३ लाख १८ हजार ९८५ रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात गांजा प्रकरणात ८६ गुन्हे तर एमडी प्रकरणात ५५ प्रकरणे दाखल करण्यात आली. त्यात अनुक्रमे १११ आणि ८७ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय ३ कोटी ३५ लाख ५१ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस आयुक्तांची मोहीम

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘ड्रग्ज फ्री सिटी’ करण्यासाठी कठोर पाऊले उचलली असून, त्यासाठी विशेष अभियान राबविले आहे. त्यातून आत्तापर्यंत ५६४ तस्करांविरुद्ध कारवाई केली आहे. एनडीपीएस पथकांच्या माध्यमातून तस्करी करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

मध्यप्रदेशातून गांजा, मुंबईतून एमडी

नागपुरात येणारा गांजा साधारणतः मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधून तर एमडीची तस्करी मुंबईतून होताना दिसून येते. यापूर्वी सोनेगाव पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांनी गेल्यावर्षी दोन कोटी रुपयांची एमडी जप्त केली. त्यामुळे शहरात एमडीचे जाळे वाढत असल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com