esakal | नागपुरात मोठ्या रॅकेटचा भांडाफोड, २१४ कोटींची जीएसटी चोरी केल्याचे उघड
sakal

बोलून बातमी शोधा

GST

नागपुरात मोठ्या रॅकेटचा भांडाफोड, २१४ कोटींची जीएसटी चोरी केल्याचे उघड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मिहानमधील आयसीटीमध्ये (ICT Mihan) बनावट कागदपत्रे तयार करून तंबाखूची निर्यात करणाऱ्या तीन कंपनीवर जीएसटी महासंचालनालयाच्या गुप्तचर विभागाने कारवाई केली. यात तिन्ही कंपन्यांनी बनावट देयके तयार करून २१३.८७ कोटी रुपयाचे इनपुट टॅक्स क्रेडीट घेत जीएसटीची चोरी (GST) केल्याचे उघड झाले असून मोठ्या रॅकेटच भांडाफोड झाला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही तंबाखूची निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांवरही कोट्यवधीचा जीएसटी चोरी केल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली होती. (gst of 214 crore stolen in nagpur)

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

जीएसटी महासंचालनालयाच्या नागपूर विभागीय कार्यालयाने एक जुलै रोजी तंबाखूची निर्यात करणाऱ्या तीन कंपन्यांवर कारवाईस सुरवात केली. मात्र, या तिन्ही कंपन्या त्या परिसरात अस्तित्वात नसल्याचे लक्षात आले. दरम्यान, शहरातील विविध भागात शोध मोहीम राबविण्यात आली. यावेळी मिहान आयसीडीमध्ये अस्त्तिवात नसलेल्या कंपन्या तंबाखूची निर्यात करीत असल्याचे दाखवून शेकडो कोटींचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे उघड झाले. या कंपन्या फक्त कागदावरच अस्तित्व असल्याचेही दिसले. नोंदणी केल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीत या अस्तित्वात नसलेल्या कंपनीने शिपींग बिले विभागामध्ये दाखल केली. त्यात धुम्रपानासाठी वापरण्यात येणारे तंबाखू मिश्रित पाईप्स आणि सिगरेटच्या उत्पादनांची निर्यात केल्याचे दाखवले आणि २१३ कोटी ८७ लाखाचा इनपुट टॅक्स क्रेडीट घेतल्याचे स्पष्ट झाले.

या घोटाळ्यात एकच व्यक्ती मुख्य सूत्रधार असून त्याचे काही पुरावे सापडले आहे. त्याच्या साहाय्याने सूत्रधाराचा शोध घेतला जात आहे. वरील परताव्याचे १२३ कोटी ९ लाखाचे परतावे हिंगणा येथील सीजीएसटी कार्यालयातून जून महिन्यात मंजूर करण्यात आले होते. याशिवाय अजून बनावट देयकाच्या साहाय्याने इनपुट टॅक्स क्रेडिट घेत असल्याचे लक्षात आल्याने जीएसटी महासंचालनालयाच्या विभागीय कार्यालयाने ८९ कोटी ९० लाखाचा परतावा थांबवून ठेवले आहेत. हे रॅकेट फक्त तीन कंपन्यापूरते मर्यादित नसून यापूर्वीही अशाच प्रकारच्या संस्थांच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांच्या साहाय्यान परतावा घेतला असल्याचा संशय आहे. त्याचाही तपास केला जात आहे.

loading image