Nagpur News: नागपूर जिल्ह्यातील पाच तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आभार
Benefits of ‘B’ class status for pilgrimage sites in Nagpur : संबंधित देवस्थानांना शासनाकडून विकास निधी उपलब्ध होणार असून, रस्ते, प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, पार्किंग, निवास व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाचा विस्तार होईल.
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील पाच प्रमुख तीर्थक्षेत्रांना महाराष्ट्रातील महायुती सरकारने ‘ब’ वर्गाचा दर्जा प्रदान केला आहे. या निर्णयामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे.