Nagpur Google Boy : जगातील १९५ देशांच्या राजधानी अन् ध्वज तो अचूक ओळखतो, ‘गुगल बॉय’ अनिश खेडकरचे अफाट ज्ञान

Nagpur Google Boy : अनिष खेडकरच्या असाधारण बुद्धिमत्तेचे होतेय सर्वत्र कौतुक.
Nagpur Google Boy
Nagpur Google Boy esakal

Nagpur Google Boy : एखादा पाच-सहा वर्षांचा चिमुकला जगातील तब्बल १९५ देशांच्या राजधानी व ध्वज अचूकपणे ओळखत असेल, तर निश्चितच आश्चर्याची गोष्ट आहे. असेच काहीसे अफाट नॉलेज नागपूरचा ‘गुगल बॉय’ म्हणून उदयास येत असलेल्या सहा वर्षीय अनिश अनुपम खेडकरला आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्याला जगातील अनेक देशांच्या चलनांसह जवळपास दोन हजार प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ आहेत. दैवी देणगीचा धनी असलेल्या अनिशच्या या असाधारण बुद्धिमत्तेचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

मनीषनगरात राहणाऱ्या व नारायणा विद्यालयात शिकणाऱ्या अनिशमध्ये लहानपणापासूनच चिकित्सक वृत्ती आहे. त्यामुळे साहजिकच तो नवनवीन जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. या उत्सुकतेतूनच अनिशने अत्यंत कमी वयातच विविध विषयांचे सखोल ज्ञान संपादित केले. विज्ञान आणि अंतरिक्ष (स्पेस सायन्स) विषयात त्याला रुची आहे. त्याला विमाने, रॉकेट्स, जेट, हेलिकॉप्टरसह स्पेस संदर्भातील पाचशे तथ्यांची (फॅक्ट्स) पुरेपूर माहिती आहे.

शिवाय ग्रह, तारे, इस्रो, नासासह जवळपास शंभर अंतराळवीर, शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले विविध शोध त्याच्या तोंडपाठ आहेत. इतकेच नव्हे, चिमुकला अनिश नकाशावरून (ग्लोब) जगातील तब्बल १९५ देशांच्या राजधानी व ध्वज, रंग व त्याची वैशिष्ट्ये बिनचूक सांगतो. कोणता देश कुठे व कोणत्या खंडात आहे, याची इत्यंभूत माहिती अनिशकडे आहे. त्याला बहुतांश देशांचे चलन माहिती आहे.

तसेच जागतिक ५० प्रसिद्ध स्मारके त्याला ठाऊक आहेत. याशिवाय देशातील सर्व राज्ये आणि त्यांच्या राजधानी त्याला माहिती आहेत. १५० कारचे लोगोही तो ओळखतो. मंगळयान, चंद्रयान, गगनयान, आदित्य एल-१ बद्दल त्याला नॉलेज आहे. अनिशला वरील विविध विषयांवरील दोन हजारांच्या जवळपास प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ आहेत.

अनिशवर झालेत गर्भसंस्कार

चाईल्ड सायकॉलॉजी कॉन्सिलर असलेल्या कल्याणी गर्भवती असताना त्यांनी स्पेस सायन्स, आंतरराष्ट्रीय घडामोडी, भारतीय संस्कृतीसह अनेक विषयांचे वाचन व अभ्यास केला. त्याचा सकारात्मक परिणाम अनिशवर दिसतोय. मुलाच्या जडणघडणीत गर्भसंस्काराची महत्वाची भूमिका असल्याचे अनिशच्या आजीने सांगितले.

कॅन्सरशी लढताना आजीचे अनिशवर संस्कार

अनिशबद्दल ‘सकाळ’शी बोलताना त्याची आई कल्याणी म्हणाल्या, याचे बहुतांश श्रेय त्याची कॅन्सरग्रस्त आजी स्मिता पंडित यांनाच जाते. त्यांच्या संस्कारामुळेच तो नावारूपाला आला. अनिश दोन वर्षांचा असताना कोविड काळात त्याचे सिव्हिल इंजिनिअर असलेले वडील अनुपम यांना नोकरीच्या निमित्ताने शहर बदलावे लागले.

त्यामुळे मी अनिशला घेऊन मुंबईवरून आईकडे नागपूरला राहायला आले होते. त्यावेळी अनिश नुकताच चालायला व बोलायला शिकू लागला होता. आजीच्या सान्निध्यात तो अंतराळच्या चित्रांमध्ये रमायचा. आजीही त्याला रोज नवनवीन माहिती द्यायची. घरी नियमित प्रयोग होऊ लागले.

Nagpur Google Boy
Nagpur Traffic :अजनी चौकातील 'ट्रॅफिक जॅम'चा भूलभूलय्या; ‘स्मार्ट सिटी’ ठरू लागली डोकेदुखी, अपघातांची भीती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com