
अचलपूर : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर दोन दिवसांच्या मेळघाट दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी मेळघाटच्या विविध आरोग्यकेंद्रांना भेटी दिल्यात, त्यानंतर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर सातत्याने करण्यात येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने धारेवर धरत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे रेफरल ऑडिट करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी आरोग्यसंचालक यांना दिले.