‘ताबडतोब आमची तपासणी करा’ कोरोना तपासणी केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन

Health worker beaten at Corona center Nagpur corona news
Health worker beaten at Corona center Nagpur corona news

वाडी (जि. नागपूर) : वाडी नगरपरिषदेजवळील माता-बाल संगोपन केंद्रात कोरोना तपासणी केंद्रावर कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण व महिला कर्मचाऱ्यांसोबत अभद्र व्यवहार करण्याच्या घटनेने आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांत रोष निर्माण झाला आहे.

गुरुवारी सकाळी तपासणी केंद्रावरील कर्मचारी उपस्थित असताना ४० ते ५० च्या संख्येने नागरिक तपासणीसाठी पोहोचले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी सर्वांना नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे केले व तपासणी सुरू केली. दरम्यान काही व्यावसायिक युवकही तपासणीसाठी पोहोचले. आरोग्य कर्मचारी रजनीश गोलाईत यांनी सांगितले की, दोन युवकांनी ताबडतोब तपासणी करण्याची मागणी केली. नकार देऊन रांगेत इतर प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांच्या तपासणीनंतर कार्यवाही करण्याचे सांगितले. यामुळे या युवकांनी वादविवाद व शिवीगाळ करणे सुरू केले.

इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. या युवकांनी कर्मचाऱ्यांला मारपीट केली व महिला कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केले. दगड फेकले व तिथून पळून गेले. अचानक झालेल्या घटनेने सर्व कर्मचारी घाबरले. घटनेची सूचना मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, तहसील आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके, डॉ. सुषमा धुर्वे यांना देण्यात आली.

सूचना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. वाडी नगरपरिषदेला या घटनेची माहिती दिली व वाडी नगरपरिषदेने पोलिसांना सूचना देताच पोलिस घटनास्थळ पोहोचले. तातडीने या कर्मचाऱ्यांना घेऊन वैद्यकीय उपचारासाठी मेयो रुग्णालयाला घेऊन गेले.

उपचार व तपासणीरिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर वाडी पोलिसांनी तक्रार दाखल केली. डॉ. सुषमा धुर्वे, डॉ. सचिन हेमके यांनी पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांची भेट घेऊन कठोर कार्यवाही व तपासणी केंद्रावर सुरक्षाव्यवस्थेची करण्याची मागणी केली. अन्यथा कर्मचारी तपासणी कार्य करणार नसल्याचे मत व्यक्त केले. ठाणेदार प्रदीप सूर्यवंशीच्या माहितीप्रमाणे आरोपींची ओळख झाली असून, फिर्यादी आरोग्यसेवक रजनीश गोलाईत (वय ३४) यांच्या तक्रारीवरून आरोपी आशीष झा व संकेत यांच्यावर गुन्हा दाखल केला.

तपासणी केंद्राचे स्थळ व पोलिस बंदोबस्तही उपलब्ध करण्यात आला. या घटनेची माहिती नागपूर ग्रामीणचे तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी यांनाही देण्यात आली. वाडी पोलिसांनी गुरुवारी या दोन्ही आरोपींना न्यायालयात नेले. तीन दिवसांचा पोलिस रिमांड मिळाल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com