

Fear Looms Large in Gondia as Leopard Kills Young Child
Sakal
तिरोडा, (जि. गोंदिया): तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्याच्या हृदयद्रावक घटनेनंतर जंगलालगत वसलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खडकीसह परिसरातील सुकडी डाकराम, पिंडकेपार, खमारी, बाळापूर, आलेझरी, बेरडीपार व खुर्शीपार या गावांमध्ये नागरिक जीव मुठीत धरून वावरत आहेत. सायंकाळी सहानंतर कुणीही घराबाहेर पडत नाही.