
बुलडाणा : जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा तालुक्यात गत तीन दिवसापासून होणाऱ्या संततधार पावसामुळे आता जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांना आलेला पूर आणि बऱ्याच धरणातून होणारा पाण्याचा विसर्गामुळे काठावरील शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये पाणी शिरले नागरिकांचे नुकसान झाले आहे.