Nagpur Rain Update :'सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस'; पुराचा वेढा भेदून आपदा मित्रांनी दिले जीवदान

Heavy Rains Lash Sironcha : सिरोंचा तालुक्यातील सोमनूर नवीन येथील रहिवासी असलेल्या चंद्रय्या कुमरी यांना शनिवार (ता. ३०) दुपारी सापाने दंश केला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे अत्यावश्यक होते. मुसळधार पावसामुळे परिसरातील मुत्तापूर नाल्याला पूर आल्याने रुग्णालयाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता.
Aapda Mitra volunteers rescue stranded villagers in Sironcha taluka after heavy rains and floods.
Aapda Mitra volunteers rescue stranded villagers in Sironcha taluka after heavy rains and floods.esakal
Updated on

गडचिरोली: मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा घातलेला असताना एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा आणि ''आपदा मित्र'' देवदूत बनून धावले. सिरोंचाचे तहसीलदार नीलेश होनमोरे यांच्या तत्काळ आदेशाने आणि विविध यंत्रणांच्या समन्वयाने, पुराच्या पाण्यातून मार्ग काढत आरोग्य पथकाने वेळेवर उपचार केल्याने चंद्रय्या कुमरी या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com