esakal | Video : भाजपने केले सातवे शहरव्यापी आंदोलन, पण कशासाठी?
sakal

बोलून बातमी शोधा

Holi of the bill and protest against electricity tariff

लॉकडाउनच्या काळातील 300 युनिटपर्यंतचे बिल माफ करा. वीजरदवाढ वर्षभरासाठी रद्द करा. बिलात आकारले जाणारे अधिभार, व्याज रद्द करा आदी मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या. आंदोलकांनी घोषणा देत राज्य सरकार व ऊर्जामंत्र्यांचा निषेध नोंदविला.

Video : भाजपने केले सातवे शहरव्यापी आंदोलन, पण कशासाठी?

sakal_logo
By
योगेश बरवड

नागपूर : भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी महावितरणच्या शहरातील ३२ उपकेंद्रांसमोर वीजबिलाची होळी करीत वीजदरवाढीचा तसेच सर्वसामान्यांना पाठविण्यात आलेल्या भरमसाट वीजबिलांचा निषेध नोंदविण्यात आला. वाढीव वीजबिलाविरोधातील भाजपचे हे सातवे शहरव्यापी आंदोलन ठरले. 

खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार गिरीश व्यास, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार क्रष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार रामदास आंबटकर, माजी आमदार सुधाकर देशमुख, डॉ. मिलिंद माने आदींनी वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनांचे नेतृत्व केले.

लॉकडाउनच्या काळातील 300 युनिटपर्यंतचे बिल माफ करा. वीजरदवाढ वर्षभरासाठी रद्द करा. बिलात आकारले जाणारे अधिभार, व्याज रद्द करा आदी मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या. आंदोलकांनी घोषणा देत राज्य सरकार व ऊर्जामंत्र्यांचा निषेध नोंदविला.

जाणून घ्या - विश्वास बसेल का? आधीच्या काळात पुरुषही घालायचे जोडवे, कारण वाचून बसेल धक्का...

आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात क्वेटा कॉलोनीजवळच्या चिंतेश्वर मंदिर सब स्टेशन समोर करण्यात आले. सोबतच मनोज चापले दीपक वाडीभस्में,देवेंद्र मेहर यांच्या नेतृत्वात सुभाननगर येथे, वर्धमाननगर येथे प्रदीप पोहाणे, चेतना टांक, सरिता कावरे, कांता रारोकर, मनीषा धवडे यांच्या नेतृत्वात,  शांतिनगर येथे संजय महाजन, प्रवीण भिसीकर, छापरूनगर सब स्टेशनसमोर बाल्या बोरकर, हिवरीनगरात मनीषा कोठे, मनपा विधि समिती अध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे यांच्या उपस्थितीत आंदोलन झाले. तुकडोजी पुतळा येथे आमदार मोहन मते, देवेन दस्तूरे, नागनदी पावर स्टेशन येथे डॉ. रवींद्र भोयर, सक्करधरा मिरची बाजार येथे दिव्या धुरडे, मोठा ताजबाग येथे मनपा स्थायी समितीये अध्यक्ष पिंटू झलके यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

गंगाबाई घाट सबस्टेशनसमोर आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात, महाल येथे आमदार गिरीश व्यास, श्याम चांदेकर, हरीश डीकोंडवार, वंदना भूरे, तुलसीबाग बंडू राऊत, गुड्डू त्रिवेदी, गांधीबाग दयाशंकर तिवारी, शाहिद चौक दीपराज पार्डीकर, संजय महाजन,अर्चना डेहनकर यांच्या नेतृत्वात, दुर्गावती चौक, जरिफटका जिंजर मॉलजवळ, भोले पेट्रोल पंप, सेमीनरी हिल्स, काटोल, कस्तूरचंद पार्क, सीताबर्डी, जयताळा, त्रिमूर्तीनगर, प्रतापनगर, टेलीकॉमनगर, खामला, अजनी, सोमलवाडा, काँग्रेसनगर, व्हीएनआयटी, भगवाननगरातही आंदोलन करण्यात आले.

loading image