Nagpur News : गृहमंत्री अमित शहा शहरात दाखल

भाजपने केले दणक्यात स्वागत; म्‍युझिकल फाउंटेनचा लुटला आनंद
Home Minister Amit Shah entered in nagpur city political
Home Minister Amit Shah entered in nagpur city politicalsakal

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरमध्ये सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास दाखल झाले. भाजपच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.

गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री आसाम येथून विमानाने रात्री पावणेआठ वाजता सुमारास नागपूरमध्ये आले. हॉटेल रेडिसन ब्ल्यू त्यांचा मुक्काम राहणार आहे. १८ फेब्रुवारीला सकाळी साडेदहा वाजता ते दीक्षाभूमीवर येणार आहेत.

सुमारे २० मिनिटे येथे थांबतील. दीक्षाभूमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ११ वाजता रेशीमबाग येथे जातील. स्मृतिमंदिर येथील डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींच्या समाधीस्थळाला भेट देऊन ते माल्यार्पण करणार आहेत. त्यानंतर सुरेश भट सभागृहातील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावून ते एक वाजता पुण्याला रवाना होणार आहेत.

अमित शहा यांच्या स्वागतासाठी फुटाळा येथील म्युझिकल फाउंटेन आणि लाईटचा विशेष ट्रायल शो खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीच्‍यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस,

भाजपा प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्‍या या फाउंटेन शोला अनेक मान्यवरांनी आतापर्यंत भेटी देऊन प्रशंसा केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com