esakal | ...अन् साडेपाच लाखांचे बिल झाले अडीच लाख, रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा

बोलून बातमी शोधा

representative image
...अन् साडेपाच लाखांचे बिल झाले अडीच लाख, रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : फक्त दिवस उपचार करणाऱ्या रुग्णांकडून साडेपाच लाख रुपयांचे बिल उकळणाऱ्या एका खासगी इस्पितळाला माजी महापौर संदीप जोशी यांनी दणका दिल्यानंतर प्रशासनाने चूक मान्य करून अडीच लाख रुपये परत केले. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळाला.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

कोविडच्या काळात काही खासगी रुग्णालयांमार्फत तीन ते पंधरा लाख रुपये अ‌ॅडव्हांस भरायला लावत आहेत. त्याशिवाय वारेमाप खर्च दाखवून बिलाची रक्कम फुगविले जात आहे. अशा अनेक तक्रारी येत असल्याने माजी महापौर संदीप जोशी यांनी तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमेश दिपानी यांनी तक्रार नोंदवली होती. संदीप जोशी यांनी संपूर्ण माहिती जाणून घेतली. बिलाची शहानिशा स्वतः केली. यात रुग्णाची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संपर्क साधला. दिपानी यांच्या बिला संदर्भात त्यांच्याकडे जाब मागितला. संदीप जोशी यांचा पवित्रा बघून व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली. बिलामध्ये दुरुस्ती करून ५.३० लाखाचे बिल अडीच लाखांचे करून दिले. कमी झालेल्या बिला नंतर संबंधित रुग्ण आणि कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून त्यांनी संदीप जोशी यांचे आभार मानले. या क्रमांकावर करा तक्रारी आनंद-९८२२२०४६७७, अमेय-९५६१०९८०५२, शौनक- ७४४७७८६१०५, मनमित-७७४४०१८७८५